Reliance’s new hire Gayatri Yadav : उद्योग क्षेत्रातील मोठा उद्योग समूह म्हणजे मुकेश अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज. नुकताच या समूहाला एक नवी अधिकारी मिळाली आहे. जी अंबानी कुटुंब आणि संचालक मंडळाच्या अत्यंत जवळून काम करणार आहे. गायत्री यादव असे या नव्या चीफ मार्केटिंग ऑफिसर च नाव आहे. याबाबत कंपनीच्या डायरेक्टर आणि चेअरमन मुकेश अंबानी यांच्या कन्या ईशा अंबानी यांनी घोषणा केली.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शेत जमिनीच्या वापरासाठीची ‘NA’ अट रद्द
गायत्री यादव असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. जी रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचे मुख्य मार्केटिंग अधिकारी तसेच समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्ह व्हॉइस प्रेसिडेंट असणार आहे गायत्री या अगोदर पीक एक्सपी पार्टनर्स येथे कार्यरत होत्या. गायत्री यांच्या नावाची घोषणा करताना ईशा अंबानी यांनी सांगितलं की, त्या आता संचालक मंडळ म्हणजेच अंबानी कुटुंबीयांच्या जवळून काम करतील.
दरवाढीनंतर आता एसटीत बदल दिसणार! पाच विभागीय मंडळांच्या स्थापनेचा प्रस्ताव
तर गायत्री यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्या आयआयएम कोलकाता येथून पदवीधर आहेत. प्रॉक्टर अँड गॅम्बल यामध्ये ब्रँड मॅनेजमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. जसं त्यांनी विस्तार केला. तेव्हा त्याला जनरल मिल्स इंडिया नाव देण्यात आलं. त्याचबरोबर त्यांनी पिल्स बरी हा ब्रँड लॉन्च करताना देखील बाजारात नव्यानेच येणाऱ्या पॅकेज फूड्स साठी त्यांनी मुख्य मार्केटिंग अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दिल्लीत भाजप सरकारचा अंदाज! मोदींच्या दोन निर्णयांनी फिरलं वारं?
स्टार इंडियामध्ये त्यांनी कंझ्यूमर स्ट्रॅटेजी आणि इनोवेशनमध्ये प्रेसिडेंट म्हणून काम पाहिलं. स्टार इंडियाच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या त्या मुख्य होत्या. त्यावेळी त्यांनी स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारचं यशस्वी नेतृत्व केलं. तसेच स्टार प्लस वाहिनीवर ‘सोच नई’ हे महिला सक्षमीकरणासाठीच कॅम्पेन देखील त्यांनीच यशस्वीपणे चालवलं.