दरवाढीनंतर आता एसटीत बदल दिसणार! पाच विभागीय मंडळांच्या स्थापनेचा प्रस्ताव
प्रशांत गोडसे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात लालपरीला तोट्यातवून बाहेर काढण्यासाठी नुकतीच भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता एसटीमध्ये (ST) अनेक बदल होणार आहेत. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एसटीमध्ये कर्नाटक पॅटर्न (Karnatak) राबवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. (Many changes are going to be made in ST Proposal to implement Karnataka pattern in ST to provide better service to passengers is under consideration.)
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धर्तीवर एसटीमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ अशा पाच विभागीय मंडळांची स्थापना होणार आहे. या प्रत्येक विभागीय मंडळाला एक भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहे.
कर्नाटक पॅटर्न नेमका काय आहे?
प्रवासी सोयी सुविधा आणि व्यवस्थापनासाठी देशातील उत्तम व्यवस्थापन म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळकडे पाहिले जाते. या महामंडळाने प्रगत सेवा आणि अत्याधुनिक व्यवस्थापन प्रणाली अंगीकारली आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळातही ही चार प्रादेशिक विभाग आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी प्रत्येक विभागाचे नेतृत्व करतो. यामुळे अधिक चांगले नियोजन आणि अंमलबजावणी होत आहे.
Kalyani family property dispute : 70 हजार कोटींसाठी दोन भाऊ भिडणार; पण मध्ये उभी आहे ‘लाडकी बहीण’!
गाडीत प्रवाशांसाठी वाय-फाय, ऑनलाइन बुकिंग, ई-तिकीट प्रणाली, आणि अचूक वेळापत्रकाचे पालन केले जाते. सर्वात महत्वाचे उच्च-गुणवत्ता असलेल्या बसेसे समाविष्ट करण्यात आले आहे. ऐरावत, अंबारी, राजहंस, सिरीगंधा आणि ‘सर्वोदय’ यांसारख्या प्रीमियम बस सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. सदर बस वातानुकूलित आणि आरामदायी आहे. सुरक्षित, वेळेवर आणि विश्वासार्ह असल्यामुळे केएसआरटीसी सेवा राज्यात लोकप्रिय झाली आहे.
तुझ्या बापाला साथ दिली, गप्प बस; माजी पंतप्रधानांच्या मुलाला बोलताना खरगेंची जीभ घसरली
पाडा तिथे एसटी हे महामंडळाचे नवे ब्रीद वाक्य :
यापूर्वी गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी हे महामंडळाचे ब्रीद वाक्य होते. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीला दळवळणाचे माध्यम म्हणून अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. आता त्यापुढे जाऊन एसटी महामंडळ आदिवासी पाड्यांसाठी ७ मीटरच्या छोट्या बसेस खरेदी करणार आहे. त्यानुसार ‘पाडा तिथे एसटी हे एसटी’ हे महामंडळाचे नवं ब्रीदवाक्य असणार आहे.