Who is Makhanlal Sarkar: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा शपविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. व्यासपीठावर एक 98 वर्षाची वृद्ध व्यक्ती उपस्थित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या व्यक्तीच्या पाया पडला, त्यांची गळाभेट घेतली. तसेच बराचवेळ त्यांचे आशीर्वाद घेतले. ती
माखनलाल सरकार हे राष्ट्रवाद चळवळीशी संबंधित आहेत. सुरुवातीच्या तळागाळातील नेत्यांपैकी एक आहेत. 1952 मध्ये काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनादरम्यान जन संघाचे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत गेल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. या काळात ते तुरुंगात होते. 1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर ते पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांचे संघटनात्मक समन्वयक होते. केवळ एका वर्षात त्यांनी पक्षात जवळपास दहा हजार सदस्य नोंदणी करण्यास मदत केली. त्यांनी 1981 पासून सलग सात वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. ज्या काळात भाजपचे नेते सहसा एकाच संघटनात्मकपदावर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहत नसत, त्या काळात त्यांनी पक्षासाठी मोठे काम केले.
राज ठाकरे यांची वैचारिक लढण्याची कुवत संपली; जालन्यातील हल्ल्यानंतर सदावर्ते आक्रमक
भाजपमध्ये कधीची जनतेचा जनाधार मिळत नव्हता. डाव्यांशी संघर्ष करत माखनलाल सरकार यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पायेमुळे रोवली आहे. त्याचे फळ भाजपला मिळत आहे. तसेच राम मंदिर आंदोलनापासून ते राम मंदिर निर्मितीपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी डोळ्यांनी पाहिला. इतकेच नाही तर शिलापूजनही त्यांच्या घराच्या अंगणात झाले होते.
दिवसातून एकदा तरी फोन कर आणि फक्त हॅलो बोल; हेमांगी कवीची मातृदिनानिमित्त आईबद्दल खास आठवण
आता त्यांची पत्नी आणि मुले त्या आठवणी भावूक होऊन सांगत आहेत. असे सांगितले जात आहे की, कालच पक्षाकडून निर्देश आले होते की माखनलाल सरकार यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहायचे आहे. त्यानंतर त्यांचा धाकटा मुलगा त्यांना घेऊन कोलकात्याला रवाना झाला होता.
