Download App

Hariyana Violence : हिंसाचाराचं कारण बनलेला मोनू मानेसर आहे तरी कोण?

Hariyana Violence : हरियाणातील नूहमध्ये जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार उफाळून आल्याची घटना घडलीयं. या हिंसाराच्या घटनेनंतर परिस्थितीत नियंत्रण आणण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. या हिंसाराचं कारण मोनू मानेसर असल्याचं बोललं जात आहे. कारण मोनू मानेसरने यात्रेआधीच आपणही या यात्रेत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मोनूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरियाणामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरच हा हिंसाचार घडला आहे. त्यामुळे आता हा मोनू मानेसर नेमका कोण? याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Manipur Violence : मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी

कोण आहे मोनू मानेसर?
मोनू मानेसरला विरोध करणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या भगव्या यात्रेवर सोमवारी दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार उसळला आहे. नूह येथे लागलेल्या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली. याशिवाय या चकमकीत अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. यासोबतच एका होमगार्डचाही मृत्यू झाला आहे.

मोनू मानेसरने जलाभिषेकाच्या भगव्या यात्रेत सहभागी होणार असल्याची घोषणा केल्यानंतरच हिंसाचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. मोहित यादव उर्फ ​​मोनू मानेसर असं त्याचं नाव असून मोनू हरियाणातील गुरुग्राममधील मानेसर इथला रहिवासी आहे.

Manipur Violence : मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी

मोनूने आठ वर्षांपूर्वी बजरंग दलात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांने गोरक्षकाचं संवर्धन करण्याचं काम हाती घेतलं. गो-तस्करीपासून गायांचं संरक्षण करण्याची मोहिमही त्याने सुरु केली होती. त्याने हरियाणामध्ये मोठं नेटवर्क तयार केलं होतं. गायींच्या तस्करीची माहिती पोलिसांच्या आधी मोनू मानेसरच्या कार्यकर्त्यांना मिळत असे. 2019 साली गो-तस्करांचा पाठलाग करताना त्याच्यावर गोळीबार झाल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता.

PM मोदींसोबत व्यासपीठावर जाणारच! पवारांचा ‘मविआ’लाच धक्का; शिष्टमंडळाला भेटायलाही नकार

गोळी लागल्याने तो जखमी झाला. यानंतरही तो स्वस्थ बसले नाहीत, त्याने गो-तस्करीच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आपले जाळे पसरवून गोवंश तस्करीला खुले आव्हान दिले. यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमधील भिवानी येथे जुनैद-नासीर या दोन तरुणांना बोलेरो गाडीत जिवंत जाळल्याप्रकरणी मोनू मानेसरचे नाव चर्चेत आले होते. मात्र, मोनूने व्हिडीओ जारी करून त्याच्या हत्येचा संबंध नसल्याचं सांगितलं होतं. मोनू मानेसर हा नसीर-जुनेद हत्याकांडात वॉण्टेड होता. या हत्येप्रकरणी राजस्थान पोलीस त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, गुरुग्रामजवळील नूह परिसरात विश्व हिंदु परिषदेद्वारे बृजमंडळ जलाभिषेक यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यात्रा गुरुग्राम-अलवर इथल्या राष्ट्रीय महामार्गावर आली तेव्हा तरुणांच्या टोळीने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरु केली. त्यानंतरच हिंसाचार उफाळून आला आहे. हिंसारानंतर पोलिसांकडून परिस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Tags

follow us