Chandrayaan-3 Landing Successful : भारताच्या मून एक्सप्लोरेशन मिशन चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) इतिहास रचला आहे. इस्रोने (ISRO) चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग (Moon Landing) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आज संध्याकाळी इस्रोने नियोजित वेळेवर म्हणजे संध्याकाळी 6:04 वाजता लँडर मॉड्यूल चंद्रावर यशस्वी उतरवले. त्यानंतर लँडर विक्रमने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या ऐतिहासिक कामगिरीसोबत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंग दरम्यान लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की आपले चांद्रयान फक्त दक्षिण ध्रुवावरच का उतरवले गेले? चंद्र मोहिमेसाठी दक्षिण ध्रुव शास्त्रज्ञांनी का निवडला आहे? चंद्राच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवाच्या तापमानात काय फरक आहे?
चांद्रयान-3 फक्त दक्षिण ध्रुवावरच का उतरले?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपली चंद्रा मोहिम उतरवण्यासाठी गेल्या काही काळापासून जगभरातील अंतराळ संस्था उत्सुक आहेत. अंतराळ शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की चंद्रावर असे खोल खड्डे आहेत, जेथे कोट्यवधी वर्षांपासून सूर्यप्रकाश पोहोचलेला नाही.
या प्रदेशांतील तापमान आश्चर्यकारकपणे उणे 248 अंश सेल्सिअस (उणे 414 फॅरेनहाइट) पर्यंत घसरते. चंद्राचा पृष्ठभाग तापण्यासाठी येथे कोणतेही वातावरण नाही. चंद्राच्या या पूर्णपणे अनोळखी जगात आजवर कोणीही पाऊल ठेवलेले नाही. नासाच्या मते, चंद्राचा दक्षिण ध्रुव रहस्य, विज्ञान आणि कुतूहलाने भरलेला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी अंतराळ स्पर्धा
बीबीसीच्या एका अहवालानुसार, नासाच्या 14 वर्षांपासून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असलेल्या लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटरने गोळा केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की कायमस्वरूपी सावली असलेल्या काही मोठ्या खड्ड्यांमध्ये पाण्याचा बर्फ आहे. यामध्ये संभाव्य जीव टिकवून राहू शकतो. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रकारची अंतराळ शर्यत सुरू आहे.
Chandrayaan 3 : चंद्रावरील फोटो चांद्रयान-3 ने मिशन कंट्रोलला पाठवले; इस्त्रोने केले शेअर
म्हणूनच दक्षिण ध्रुव चंद्र मोहिमांसाठी फेवरेट
अंतराळ तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात जास्त पाणी आहे, जो एक मौल्यवान स्त्रोत आहे. तज्ज्ञांच्या मते, चंद्राचे ध्रुव खूप समान आहेत. दोन्हीमध्ये उंच भूभाग आणि खडबडीत भूभाग आहे, यामध्ये मोठे खराब झालेले विवर आणि लहान ताजे विवर आहेत.
ज्वालामुखीचा स्फोट किंवा उद्रेक झाल्यामुळे निर्माण झालेले खड्डे म्हणजे विवर. ध्रुवांमधील अंतर खूपच कमी आहे. चंद्राच्या ध्रुवांवर अशी ठिकाणे आहेत जी नेहमी सूर्यप्रकाशात असतात. चंद्राचा दक्षिण ध्रुव तुलनेने कमी थंड आहे. या भागात अंधारही कमी असतो.
Chess World cup 2023 Final : प्रज्ञानानंदने आजही कार्लसनला रोखलं; उद्या पुन्हा होणार निर्णायक लढत
चंद्र मोहिमेसाठी सूर्यप्रकाश वरदान
उदाहरणार्थ, शॅकलेटॉन विवरजवळील भागात सूर्यप्रकाश बराच काळ असतो. आपल्या पृथ्वी प्रमाणे येथे 200 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रकाश कायम राहतो. चंद्र मोहिमांसाठी सतत सूर्यप्रकाश एक वरदान आहे. हा सूर्यप्रकाश शोधकांना चंद्राच्या पृष्ठभागावर उजेडासाठी आणि त्यांच्या उपकरणांना शक्ती देण्यास मदत करतो.
चांद्रयान-3 चे लँडरही सूर्यप्रकाशातील ऊर्जा घेऊन काम करेल. तसेच, चंद्राचा दक्षिण ध्रुव अनेक तांत्रिक कारणांमुळे लँडिंगसाठी अनुकूल मानला जातो, ज्यात प्रकाशाची उपलब्धता, संप्रेषणे आणि नेव्हिगेट करणे सोपे आहे.