Download App

Chandrayaan 3 : चंद्रावरील फोटो चांद्रयान-3 ने मिशन कंट्रोलला पाठवले; इस्त्रोने केले शेअर

Chandrayaan 3 : जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान-3 चं चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंडिग झालं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं दक्षिण ध्रुवावर लॅंडिग झालं असून दक्षिण ध्रुवावर चांद्रयान लॅंड करणारा भारत पहिला वाहिला देश ठरला आहे. त्यामुळे भारतीयांसाठी मान उंचावणारी बाब आहे.

चंद्रावर ऑटोमॅटिक पद्धतीने या चांद्रयानाने आपलं लॅंडिग केलं असून आता चांद्रयानाचं लॅंडर मॉड्यूल आणि इस्त्रोचं बंगळूरुमधील मिशन कंट्रोलमध्ये कम्युनिकेशन लिंक अॅक्टिव्हेट झाली आहे. ही लिंक अॅक्टिव झाल्यानंतर चांद्रयानाच्या लॅंडिंगनंतरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील काही फोटो समोर आले आहेत. यासंदर्भात ट्विट करीत इस्त्रोने माहिती दिली आहे. चांद्रयान-3ची लँडिंग प्रक्रिया सुरू असतानाची हे दृश्य असल्याचं इस्त्रोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

New Education Policy नुसार आता वर्षातून दोनदा होणार बोर्ड परिक्षा; शिक्षण मंत्रालयाची माहिती

चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यानंतर भारतीयांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच जगभरासह देशातून इस्त्रोचं कौतुक केलं जात आहे. चंद्रावर लॅंडिंग होताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश असल्याचं चांद्रयान -3 मोहिमेचे प्रकल्प संचालक पी वीरमुथूवेल यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, चांद्रयानचं चंद्रावर लॅंडिग झाल्यानंतर आता पुढे काय होणार? याबद्दल अनेकांना प्रश्न पडला असून या चांद्रयानातून विक्रम लॅंडर चंद्राच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तसेच काही चाचण्याही केल्या जाणार असून चंद्रावरील जमिनीचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

Tags

follow us