Download App

Chess World cup 2023 Final : प्रज्ञानानंदने आजही कार्लसनला रोखलं; उद्या पुन्हा होणार निर्णायक लढत

Chess World cup 2023 Final : बुद्धीबळ विश्वचषक 2023 ( Chess World cup 2023) मध्ये अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने ( R Pragganananda ) हे पुन्हा एकदा सिद्ध केलं की, बुद्धीबळ या खेळात खेळणारा खेळाडू हा कोणत्याही योगायोगाने नाही तर त्याच्या बुद्धीचातुर्य आणि तंत्रकौशल्याच्या जोरावरच जिंकत असतो. कारण प्रज्ञानानंदाने अंतिम फेरी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या मॅग्नम कार्लसनला सलग दुसऱ्या दिवशी बरोबरीत रोखलं आहे.

Chandrayaan 3 Landing : मोहिम फत्ते! ‘आता चंद्रावरील दक्षिण ध्रुव आमचाच’; जगाचा भारताला सलाम…

पुन्हा हा सामना खेळवला जाणार…

हा सामना बरोबरीत झाल्याने आता पुन्हा हा सामना खेळवला जाणार आहे. बुद्धीबळ विश्वचषक 2023 ( Chess World cup 2023) चा सामना आता उद्या गुरूवारी होणार आहे. आज प्रज्ञानानंदाने कार्लसनला 35 मिनिटांच्या अटीत सामन्यात कट्टल लढत दिली. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या सहमतीने आजचा सामाना देखील बरोबरीत सोडण्यात आला. दरम्यान सेमीफायनलमध्ये भारताच्या प्रज्ञानानंदाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बुद्धीबळपटूला पराभूत केलं. त्याने अंतिम फेरीत मजल मारली.

‘पवारांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, आता व्यापाऱ्यांसाठी गळे काढताहेत; अनिल बोडेंची टीका

तर प्रज्ञानानंदचा अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या मॅग्नम कार्लसन कालपासून लढत सुरू आहे. कालचा सामना देखील बरोबरीत झाल्याने आज पुन्हा हा सामना खेळवला गेला. मात्र आजही बुद्धीबळ विश्वचषक 2023 ( Chess World cup 2023) चा सामना बरोबरीत झाला आहे. हा सामना बरोबरीत झाल्याने आता पुन्हा हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता यामध्ये उद्या काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुद्धीबळातील ग्रँडमास्टर म्हणजे पीएचडी मिळवण्यासारखं आहे. लहान वयात ती मिळवणं सोपंही नाही. बुद्धिबळ खेळात दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. खुल्या जिथे कुणीही पैसे भरून खेळू शकतं. तर काही निमंत्रितांच्या जिथे रेटिंग महत्त्वाचं ठरतं. तर क्रिकेट प्रमाणेच बुद्धिबळातही सुरुवात, खेळाचा मध्य आणि शेवट असे तीन भाग असतात. जर सुरुवातीला तुमचा खेळावर ताबा असेल तर शेवटही तुम्ही चांगला करता. याचं तत्वावर प्रज्ञानानंद इथवर पोहचला.

Tags

follow us