पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान न्यायालयात हजर होण्यासाठी जात असताना त्यांना अटक झाली आहे. इम्रान खान यांना का अटक झालीय? त्याबाबत जाणून घेऊयात सविस्तर.
काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकानं धाडली ममता बॅनर्जींना नोटीस; नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या (IHC) बाहेरून अटक केली आहे. इम्रान त्याच्यावर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन मागण्यासाठी गेला होता.
Video : ‘माझी हत्या करण्याचा ISI चा कट’; अटकेआधी Imran Khan यांचा खळबळजनक आरोप
तसेच इम्रान खान यांच्यामुळे देशाच्या तिजोरीचे 190 दशलक्ष पौंडचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खान यांच्यावर ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने सरकारला पाठवलेले 50 अब्ज रुपयांचा घोटाळा केल्याचाही आरोप आहे.
2024 मध्ये राष्ट्रवादी असेल सर्वात मोठा पक्ष.. फडणवीसांच्या टीकेवर जयंत पाटलांचं भाकीत
इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर पीटीआय नेते देखील पीटीआय सरकार आणि प्रॉपर्टी टायकून यांच्यातील कराराशी संबंधित NAB चौकशीला सामोरे जात आहेत.
नुकतंच इम्रान खानने आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी लष्कराने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर मंगळवारी इम्रानने एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन पुन्हा तोच आरोप केला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर सुमारे चार तासांनी इम्रानला न्यायालयाबाहेरून अटक करण्यात आली.