Delhi Assembly Election 2025 : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Assembly Election 2025) घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी दिली. तसेच आजपासून दिल्लीमध्ये अचारसंहिता लागू करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार रात्री 11 वाजता मतदानाची टक्केवारी कशी वाढते याबाबत देखील माहिती दिली आहे. हरियाणा (Haryana) आणि महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएमवर (EVM) आरोप करत मतदानाच्या टक्केवारीवर उपस्थित केले होते. त्यामुळे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत देखील भाष्य केले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, सायंकाळी 6 वाजेपर्यंतच मतदान होत असते मात्र अनेक ठिकाणी किंवा अनेक मतदान केंद्रांवर सहानंतर देखील मतदान सुरु असते आणि त्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये नेले जातात. त्यामुळे सर्वात आधी सहापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी दिली जाते आणि त्यानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये पोहोचल्यानंतर अंतिम टक्केवारी देण्यात येते जी सायंकाळी सहा वाजता येणाऱ्या टक्केवारीपेक्षा जास्त असते अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
तसेच या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता नाकारली. ईव्हीएममध्ये व्हायरस प्रवेश करू शकत नाही त्यामुळे ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकत नाही. असं राजीव कुमार म्हणाले.
कॅश की फास्टटॅग? मंत्रिमंडळातील निर्णयानंतरही वाहनचालकांमध्ये संभ्रम कायम
तर दुसरीकडे यावेळी देखील दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी पुन्हा एकदा सत्ता मिळवणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.