अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन; हरियाणातील एका गावाला कार्टर यांचं नाव, वाचा सविस्तर

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन; हरियाणातील एका गावाला कार्टर यांचं नाव, वाचा सविस्तर

Former US President Jimmy Carter Dies At Age 100 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (Jimmy Carter Death) यांचं 29 डिसेंबर रोजी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. मात्र, 1977 ते 1981 अशी 4 वर्षे देशाचे राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, जिमी कार्टर यांचे जॉर्जियातील त्यांच्या घरी निधन झालंय. राष्ट्रपती या नात्याने त्यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा (Former US President Death) झाली. त्यांना 2002 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मोठी बातमी! शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा भीषण अपघात, मद्यधुंद ट्रक चालकाची धडक

जिमी कार्टरचा (US President) जन्म जॉर्जियातील प्लेन्स येथे झाला. ते त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध होते. लोकसेवेच्या त्यांच्या समर्पणाच्या बळावरच ते अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. राष्ट्रपती होण्यापूर्वी ते जॉर्जियाचे गव्हर्नरही होते. कार्टर 1976 मध्ये बाहेरील उमेदवार म्हणून अध्यक्षपदासाठी उभे होते. त्यानंतर त्यांनी एक विधान केले, ज्यामध्ये मी तुमच्याशी खोटे बोललो किंवा दिशाभूल करणारी विधाने केली तर मला मत देऊ नका, असं त्यांनी म्हटलं होती. त्या काळात कार्टर यांनी पारदर्शक आणि सार्वजनिक निवडणूक प्रचार केला. त्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांचा पराभव केला होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर 1978 मध्ये कार्टर भारत दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ हरियाणातील एका गावाचे नाव कार्टरपुरी ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने जिमी कार्टर यांच्या मृत्यूची घोषणा करणारे अधिकृत निवेदन जारी केले होते. त्यानंतर अमेरिकेचा ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला. जिमी कार्टर यांच्या निधनावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देखील शोक व्यक्त केलाय.

2024 मध्ये सर्वात जास्त कमाई ; स्वप्नील जोशीचे ‘हे’ दोन चित्रपट ठरले अव्वल!

डोनाल्ड ट्रम्प यांनी जिमी कार्टर यांच्या निधनावर सोशल मीडिया पोस्टवर लिहिलंय की, मी नुकतीच राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाची बातमी ऐकली. राष्ट्राध्यक्ष या नात्याने जिमीला ज्या आव्हानांचा सामना करावा लागला, ते आपल्या देशासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आले होते. त्याने सर्व अमेरिकन लोकांचे जीवन सुधारण्यासाठी सर्वकाही केले. आम्ही सर्व त्याचे ऋणी आहोत. या कठीण काळात मेलानिया आणि मी कार्टर कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहोत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या