ट्रम्प यांचे व्याही प्रेम… दोन्ही मुलींच्या सासऱ्यांना दिली खास जबबादारी

ट्रम्प यांचे व्याही प्रेम… दोन्ही मुलींच्या सासऱ्यांना दिली खास जबबादारी

US President Donald Trump Daughters Husband : नुसतं भारतातच नाही तर विदेशात देखील व्याही प्रेम पाहायला मिळतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दोन्ही व्याह्यांवर खास जबाबदारी सोपवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना दोन मुली आहेत. पहिली पत्नी इवानापासून त्यांनी इवाका नावाची मुलगी, तर दुसरी पत्नी मार्ला मॉपल्सपासून त्यांनी टिफनी नावाची मुलगी आहे. पदाभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या दोन्ही मुलींच्या सासऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

ट्रम्प यांची मोठी मुलगी इवांका हिचा विवाह 2009 मध्ये जेयर्ड कुश्नरशी झाला होता. इवांका व्यवसायाने लेखिका आणि उद्योजिका आहे. ट्रम्प यांनी इवांकाचे सासरे चार्ल्स कुश्नर यांची फ्रान्समधील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती (Donald Trumps News) केलीय. ट्रम्प यांनी चार्ल्स कुशनर यांचं वर्णन एक उत्कृष्ट व्यावसायिक नेते आणि एक उत्तम सौदा करणारे म्हणून केलंय. ट्रम्प आणि चार्ल्स एकमेकांना रिअल इस्टेट व्यवसायातून ओळखत असल्याची माहिती मिळतेय.

“दिल्लीतील साहित्य संमेलन दलालांचे”, राऊतांच्या आरोपांवर संजय नहारांचं मुद्देसूद उत्तर

चार्ल्स कुश्नर 2005 मध्ये खोटे कर विवरणपत्र तयार केल्याबद्दल आणि संघीय निवडणूक आयोगाला खोटे विधान केल्याबद्दल दोषी आढळले होते. या प्रकरणात त्यांनी सुमारे 16 महिने तुरुंगवासही भोगलाय. परंतु 2020 मध्ये ट्रम्प यांनी राष्ट्रपतींच्या अधिकारांचा वापर करून त्यांना माफ केले. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात जेयर्ड कुश्नर यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी ते ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून काम करत होते.

धाकटी मुलगी टिफनी हिच्या सासऱ्यांवर ट्रम्प यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. टिफनीचे सासरे मसाद बोलस यांची अरब आणि मध्य पूर्वच्या व्यवहारांत राष्ट्रपतींचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान मसाद बोलास यांनी अरब-मुस्लिम आणि मुस्लिम नेत्यांची भेट घेतली होती. मिशिगनमध्ये ट्रम्पच्या विजयात मसाद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2020 मध्ये येथील लोकांनी बायडेन यांच्या समर्थनार्थ मतदान केले होते, पण यावेळी मात्र मसाद यांच्या मदतीने ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये निवडणूक जिंकली.

विजय शिवतारे नाही नाही म्हणाले….. पण ‘शिवदीप’ राजकारणाच्या दिशेने निघाले

निवडणूक प्रचारादरम्यान मसादने अरब अमेरिकन लोकसंख्या असलेल्या भागात बऱ्याच सभा घेतल्या. ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांची मुलगी टिफनी हिचे लग्न मसाद यांचा मुलगा मायकेलशी झाले होते. हा साखरपुडा व्हाईट हाऊसमध्येच झाला होता, त्यानंतर दोघांनीही 2022 मध्ये लग्न केलं होतं. मसाद यांचा जन्म लेबनॉनमध्ये झाला होता. परंतु त्यानंतर ते कुटुंबासमवेत टेक्सॉसला स्तित झाले. तिथे त्यांनी ह्यूस्टन विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आणि अमेरिकेचं नागरिकत्व मिळवलं. मसाद यांचा मुलगा मायकेल आणि ट्रम्प यांची मुलगी टिफनी यांची भेट मायकोनोस येथील अभिनेत्री लिंडसे लोहानच्या क्लबमध्ये झाली होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube