रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

Two Accused Arrested for obscene posts against Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केलीय. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, (obscene posts) अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

विजय शिवतारे नाही नाही म्हणाले….. पण ‘शिवदीप’ राजकारणाच्या दिशेने निघाले

रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. पोलिसांनी याप्रकरणी मुंबईतून दोन तरूणांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही तरूण सोलापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळतेय. त्यांना मात्र मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांनी अटक केली आहे.

लढा देऊ, पैसे बंद होणार नाही…आम्ही लाडक्या बहि‍णींच्या बाजूने; जयंत पाटील

आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम 78, 79, 351(3), 351(4), 61(2) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A अंतर्गत मुंबई सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपी आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे, तर अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून अटक करण्यात आली. या दोघांना आज गिरगाव येथील 18व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube