मोठी बातमी! शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा भीषण अपघात, मद्यधुंद ट्रक चालकाची धडक
Shiv Sena MP Ravindra Waikar Car Accident : मुंबईतून मोठी बातमी समोर आलीय. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Accident) यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. ही घटना रविवारी मध्यरात्री घडल्याची घटना समोर आलीय. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात (Ravindra Waikar News) झालाय. या अपघातप्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलीय. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत, परिसरातील सीसीटीव्ही तपासला जातोय.
रविवारी मध्यरात्री उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदारांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी खासदार रवींद्र वाईकर देखील गाडीत असल्याची माहिती समोर (Maharashtra Politics) आलीय. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री हा अपघात झालाय. आयशेर टेम्पोने वायकरांच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये कोणती जीवितहानी झालीय का, याची माहिती अजून समोर आली नाही.
सरेंडर करण्याशिवाय पर्याय उरलाच नाही; वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला
अपघात घडल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातप्रकरणी अधिक चौकशी केली जातेय. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरीचा सीआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर ही दुर्घटना झालेली आहे. एका टेम्पोची वायकरांच्या गाडीला जोरदार धडक बसली. परंतु या अपघातात खासदार रवींद्र वायकर बचावले आहेत. चालक मात्र मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी हे खाद्य; पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळींच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल
रवींद्र वायकर कोण आहे?
लोकसभा निवडणुकीच्या काळात रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत रवींद्र वायकरांनी विजय मिळवला. वायकर सलग चारवेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक पदी निवडून आलेत. तर 2009 मध्ये वायकरांनी विधानसभा निवडणूक लढवली. 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण आणि उच्च, तंत्रशिक्षण मंत्रिपद सांभाळलं. तर वायकरांनी रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं आहे.