ऐन निवडणुकीत रवींद्र वायकर यांना दिलासा! कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद, गैरसमजातून गुन्हा नोंदवल्याचा अहवाल

ऐन निवडणुकीत रवींद्र वायकर यांना दिलासा! कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद, गैरसमजातून गुन्हा नोंदवल्याचा अहवाल

Ravindra Waikar Gets Relief In Jogeshwari Land Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना (Ravindra Waikar) विधानसभेच्या रणधुमाळीत मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाने जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबचं कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा गैरसमजातून दाखल (Jogeshwari Land Scam) झालाय, असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नुकताच यासंदर्भात अहवाल सादर (Maharashtra Politics) केला गेलाय. या अहवालामध्ये म्हटलंय की, मुंबई महापालिकेने रवींद्र वायकरांविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केलाय. हे प्रकरण बंद करण्याची मागणी आर्थिक गुन्हे शाखेने केलीय. यासंदर्भात अहवाल कोर्टामध्ये दाखल केलाय. हा अहवाल आता गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला आहे.

“मीच तुतारीच्या नेत्याला सांगितलं अन् माझ्याविरुद्ध..”; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

मागील काही दिवसांपू्र्वी रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये वायकर यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत 48 मतांसह त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव झालाय.

रोहीत पाटील तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद; आर आर आबांच्या मुलासाठी शरद पवार मैदानात

आता रवींद्र वायकर यांना क्लीन चिट देत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गैरसमजातून हा गुन्हा नोंदवला, असा अहवाल देखील कोर्टात सादर केला. रवींद्र वायकर यांच्या विरोधातील तपास बंद झाल्यामुळे आता त्यांना मोठा दिलासा मिळालाय. रवींद्र वायकर यांच्या पत्नीसह अन्य भागीदारांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्याची मागणी पालिकेने केलीय. मात्र, अभियंत्याच्या माध्यमातून केलेली तक्रार चुकीच्या माहितीच्या आधारे नोंदवली होती, असं आता सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube