महापालिकेचा गैरसमज झाला; भूखंड प्रकरणात रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट
Ravindra Waikar : भूखंड घोटाळा प्रकरणत गुन्हा दाखल असलेले आणि त्यासाठी कुटुंबासह वारंवार न्यायालयात चकरा मारणारे रविंद्र वायकर आता गुन्हेमुक्त झाले आहेत. मुंबई महापालिकेने हा भूखंडाचा गुन्हा गैरसमजातून दाखल केल्याचं म्हणत (Mumbai Police) मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. (Ravindra Waikar ) दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटल्यानंतर जोगेश्वरीचे तत्कालीन आमदार आणि सध्याचे मुंबई उत्तरचे खासदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पुढच्या काळात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आले.
महसूल बुडवल्याचा आरोप Video: हाथरस दुर्घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया; अराजकता निर्माण करणाऱ्या कोणालाही
भाजप नेते किरीट सोमय्यां यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
भूखंड घोटाळा प्रकरण काय?
मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात 13 हजार 674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 500 कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रविंद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेल बांधलं असल्याचा आरोप आहे.
चौकशीला गैरहजर अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट; तीन तास बंद दाराआड खलबत
या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महाापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असे त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र, वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली.
काय आहे रवींद्र वायकरांचं जोगेश्वरी भूखंड प्रकरण ?
- जोगेश्वरीतल्या 13,674 चौरस फुटांच्या भूखंडाचा घोटाळा
- 2004 ला वायकर-मनपा-महल पिक्चर्समध्ये भूखंडासाठी करार
- भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी होता आरक्षित
- भूखंडाची किंमत अंदाजे 500 कोटी रुपये
- राखीव भूखंडावर वायकरांकडून पंचतारांकित हॉटेलची उभारणी
- हॉटेलच्या बांधकामासाठी मुंबई मनपाची परवानगीच नाही