आम्हाला फक्त न्या द्या…काश्मिरी अन् मुस्लिम लोकांना…पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या पत्नीची प्रतिक्रिया

२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये नवरालचाही स

आम्हाला फक्त न्या द्या...काश्मिरी अन् मुस्लिम लोकांना...पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या पत्नीची प्रतिक्रिया

आम्हाला फक्त न्या द्या...काश्मिरी अन् मुस्लिम लोकांना...पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या पत्नीची प्रतिक्रिया

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप आहे. (Attack) दरम्यान, २२ एप्रिलच्या घटनेत जीव गमावलेले भारतीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी म्हटलं आहे की, ज्यांनी तिच्या पतीची हत्या केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे, परंतु यामुळे मुस्लिम आणि काश्मिरींना लक्ष्य केलं जाऊ नये. विनय नरवाल यांच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

मला कोणाविरुद्ध द्वेष नको आहे. या घटनेमुळे लोक काश्मिरी लोकांना आणि मुस्लिमांना लक्ष्य करत आहेत. आम्हाला ते नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे. या घटनेत फक्त न्याय हवा आहे. ज्यांनी नरवालसोबत अन्याय केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यासोबतच हिमांशीने लोकांना तिच्या दिवंगत पतीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात पाकच्या कटाचे पुरावे मिळाले; NIA च्या अहवालात मोठा खुलासा

२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये नवरालचाही समावेश होता. या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे एक आठवडा आधी नरवाल आणि हिमांशी यांचं लग्न झालं होतं. तत्पूर्वी, विनय नरवाल यांच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी हरियाणातील कर्नाल येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नौदल अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहताना नरवालची आई आणि पत्नी हिमांशी यांना अश्रू अनावर झाले होते.

कर्नाल येथील ‘नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड अ‍ॅक्टिव्हिस्ट्स’ या स्वयंसेवी संस्थेने हे शिबिर आयोजित केलं होतं. यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, दिवंगत अधिकाऱ्याने नौदलात असताना समर्पणाने आपल्या देशाची सेवा केली आणि ते नेहमीच सर्वांच्या हृदयात जिवंत राहतील. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना एका वक्त्याने सांगितलं की, दहशतवादी निष्पाप लोकांचं रक्त सांडतात. परंतु, या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचू शकतात.

Exit mobile version