Download App

PM Narendra Modi B’day : पंचाहात्तरीच्या उंबरठ्यावर पोहचलेले मोदी राजकारणातून निवृत्त होणार?

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगतसिंह कोश्यारी, आनंदीबेन पटेल. भाजपची एकेकाळची बडी नावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपर्यंत पोहचविण्यात या नेत्यांचा मोठा रोल होता. पण कालांतराने हे नेते भाजपच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत गेले आणि नंतर मार्गदर्शक मंडळात यांचा समावेश झाला. कारण होतं या नेत्यांनी वयाची पूर्ण केलेली पंचाहात्तरी. आता याच नेत्यांच्या यादीत पंचाहात्तरीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होणार का? असा सवाल विचारला जात आहे. (Will Prime Minister Narendra Modi retire from politics after completing seventy-five years of age)

या प्रश्नांचे उत्तर देणारा त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेख :

पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची 72 वर्षे पूर्ण करून 73 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेल्या मोदींनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात वडनगरमधूनच केली. ‘चायवाला ते देशाचे पंतप्रधान’ हा त्यांचा राजकीय प्रवास सगळ्यांनाच थक्क करणार आहे. वडनगर रेल्वे स्टेशनवर मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचं चहाचं दुकान होतं आणि इथेच त्यांनी चहा विकून वडिलांना हातभारही लावला, त्यासोबतच जिद्दीने अभ्यासही केला.

अगदी कमी वयातच मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजेच आरएसएसशी जोडले गेले. आरएसएसचे सदस्य, प्रचारक सुद्धा काम केलं. या काळातच त्यांच्यातील भाषा कौशल्य, राजकारण्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण याची जडणघडण झाली. लक्ष्मणराव इनामदार आणि डॉ. हेडगेवार यांच्या प्रभावामुळे, हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे रक्षण करण्याची आणि संघाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा मोदींनी घेतली.

भारतात येणार आणखी चित्ते; PM मोदींच्या बड्डेला घोषणा होण्याची शक्यता

त्यानंतर ते सक्रिय राजकारणात आले. 2001 ते 2014 पर्यंत सलग चार विधानसभा जिंकत गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. 2014 लोकसभा निवडणुकीवेळी देशात अभूतपूर्व अशी मोदी लाट आली आणि देशात सत्तांतर झालं. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 ला भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली घेतली. पुढे 2019 च्या ही लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिष्मा कायम राहिला. तेव्हा 30 मे 2019 ला मोदींनी सलग दुसऱ्यांदा भारताचे पंधरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मात्र आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा मोदींचाच असणार का अशी शंका पडते? आणि याचं कारण म्हणजे मोदींच्या वयाची 75 वर्षे.

सर्वसाधारणपणे आणि नियमानुसार वयाच्या 58 व्या ते साठाव्या वर्षापर्यंत व्यक्ती आपल्या कार्यातून निवृत्त होतो. मात्र राजकारणी याला अपवाद ठरतात. राजकारणात असे अनेक चेहरे आहेत ज्यांनी वयाची 70च नाहीतर 80 वर्ष सुद्धा पार केलीत आणि ते अजूनही राजकारणात सक्रिय आहेत. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जर मोदी विजयी झाले तर ते सलग तीन वेळा सत्ता मिळवणारे पंडित नेहरू नंतरचे पहिले पंतप्रधान ठरतील. मात्र इथे आडवी येते ते भाजपच्या नियमाची अट. ती म्हणजे वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यावर घ्यावी लागणारी निवृत्ती.

बायडन अन् सुनक यांना पिछाडले; जागतिक नेत्यांमध्ये PM मोदी पुन्हा अव्वल

कारण भाजपचे आणि संघाचे बडे नेते असणारे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे वयाच्या अनुक्रमे 86 आणि 80 व्या वर्षापर्यंत राजकारणात सक्रिय होते. तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांना भाजपकडून पत्र पाठवत निवडणूक लढवू नये असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मोदींनी राजकारणात प्रवेश केला, सत्ता गाजवली त्याच नेत्यांना तुम्ही निवडणुका लढवू नका असं सांगण्यात आणि अडवाणी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले नव्हते. त्यांच्या पारंपारिक गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाहांनी निवडणूक लढवली आणि विजयही झाले.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र स्वतःला या अलिखीत नियमापासून लांब ठेवणार असं दिसत आहे. नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना, “माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, ये मोदी की गॅरंटी है” असं म्हणत पुन्हा परतण्याचे संकेत दिले आहेत. याचा अर्थ ते 2024 ची निवडणूक लढविणार असून भाजपची सत्ता आल्यास तेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. मात्र त्यांना वयाची 75 वर्ष पूर्ण होण्यासाठी निवडणुनंतर अडीच वर्षांचा कार्यकाळ हातात असणार आहे. त्यामुळे अडीच वर्षानंतर अर्थात 2026 मध्येच कळून येईल की ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार की, कायम राहणार.

follow us