Raghav Chadha : पॉवर कमी झाली, पण पाकीट गरमच; पद गेल्यानंतर चड्ढांना किती मिळणार सॅलरी?

Raghav Chadha : चड्ढांना हटवून अशोक मित्तल यांच्याकडे जबाबदारी, फेरबदलानंतर चड्ढा यांच्या पगारात कपात होणार का?

Raghav Chadha : पॉवर कमी झाली, पण पाकीट गरमच; उपनेतेपद गेल्यानंतर किती मिळणार सॅलरी?

Raghav Chadha : पॉवर कमी झाली, पण पाकीट गरमच; उपनेतेपद गेल्यानंतर किती मिळणार सॅलरी?

Raghav Chadha’s Salary Reduced After Steps Down? : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून (Deputy Leader) हटवण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. आता त्यांच्या जागी अशोक मित्तल ही जबाबदारी सांभाळणार आहेत. मात्र, या बदलानंतर राघव चड्ढा यांच्या पगारात कपात होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…

“माझ्या शांततेला हार समजू नका, मी वेळ आल्यावर वादळ बनेन!”; राघव चड्ढांचा ‘आप’ला थेट इशारा

‘डिप्टी लीडर’ हे केवळ पक्षांतर्गत दिलेले पद

राज्यसभेतील ‘डिप्टी लीडर’ (उपनेता) हे पद संवैधानिक किंवा वैधानिक पद नाही. हे केवळ पक्षांतर्गत दिलेले एक पद आहे. या पदासाठी सरकारकडून कोणताही अतिरिक्त पगार किंवा विशेष आर्थिक भत्ता दिला जात नाही. त्यामुळे, चड्ढा यांचे हे पद गेले तरी त्यांना एक खासदार (MP) म्हणून मिळणारे सर्व मानक वेतन आणि भत्ते पूर्वीसारखेच सुरू राहतील.

मोठा दिलासा! आता छोट्या चुकांसाठी जेल नाही; मोदी सरकारचा नवा ‘जन विश्वास’ कायदा, काय बदलणार?

चड्ढांच्या पगाराचा आणि भत्त्यांचा तपशील

भारतात खासदारांचे वेतन हे त्यांच्या पक्षातील पदावर अवलंबून नसते. राघव चड्ढा यांना दरमहा 1,24,000 वेतन दिले जाते. याशिवाय दरमहा 70,000 मतदारसंघ भत्ता आणि कार्यालयीन खर्चासाठी दरमहा 60,000 भत्ता दिला जातो. याशिवाय दैनिक भत्त्यापोटी संसद सत्र किंवा समितीच्या
बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दररोज 2,500 दिले जातात. Will Raghav Chadha’s Salary Reduced After Steps Down

Raghav Chadha : एअरलाईन्सची लूट ते ट्रॅफिक जाम; चड्ढांच्या प्रश्नांनी सरकार हादरलं अन् आता पद गेलं

आर्थिक नुकसान नाही, पण ‘राजकीय’ फटका मोठा

चड्ढा यांचे उपनेतेपद गेल्यानंतर त्यांचे आर्थिक नुकसान होत नसले तरी, पक्षातील प्रभाव आणि जबाबदाऱ्यांमध्ये मोठा फटका बसला आहे. कारण, उपनेते म्हणून चड्ढा पक्षाची संसदीय रणनीती ठरवण्यात मोठी भूमिका बजावत होते, ती जबाबदारी आता अशोक मित्तल यांच्याकडे असेल. तसेच राज्यसभा सचिवालयाशी ताळमेळ राखणे, चर्चेत पक्षाचा सहभाग निश्चित करणे आणि खासदारांमध्ये शिस्त राखणे यांसारखे अधिकार आता चड्ढा यांच्याकडे नसतील. त्याशिवाय सभागृहाच्या कामकाजात उपनेते म्हणून मिळणारे प्राधान्य आता त्यांना मिळणार नाही.

इतर सुविधा कायम राहणार

जबाबदाऱ्या बदलल्या तरी खासदार म्हणून मिळणारे इतर सर्व विशेषाधिकार चड्ढा यांना कायम राहतील. यामध्ये दिल्लीतील सरकारी निवासस्थान, मोफत रेल्वे आणि विमान प्रवास, तसेच CGHS योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा समावेश आहे. थोडक्यात काय तर, राघव चड्ढा यांच्या ‘पॉवर’मध्ये घट झाली असली, तरी त्यांना मिळणाऱ्या दरमहा पगार आणि इतर भत्त्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Exit mobile version