World Poverty Eradication Day 2024 : जागतिक बँकेने नुकताच एक (World Bank Report) अहवाल जारी केला आहे. जगातील 26 गरीब देशात (World Poverty Eradication Day 2024) जगातील एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के लोक राहतात. 2006 नंतर अन्य कालावधीच्या तुलनेत हे देश सर्वाधिक कर्जात असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच या देशातील लोकांना सातत्याने नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. कोरोना संकटांनंतर (Covid 19) अनेक देशांची अर्थव्यवस्था अजूनही रुळावर आलेली नाही. काही देशांनी मात्र यात सुधारणा केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थाही या संकटातून बाहेर आली आहे.
वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेच्या (International Monetary Fund) बैठकीच्या एक आठवडाआधी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक गरीब देशांना 100 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचा प्रयत्न जागतिक बँकेकडून आगामी काळात केला जाणार आहे.
गरिबीच संकट वाढलं! जगातील ‘या’ दहा देशांत प्रचंड गरीबी, उत्पन्नातही घट
जागतिक बँकेने म्हटले आहे की जगात 26 देश अत्यंत गरीब आहेत. या देशांचे वार्षिक प्रति व्यक्ती उत्पन्न 1145 डॉलर्सपेक्षाही कमी आहे. आंतरराष्ट्रीय विकास संघाच्या मदतीने आणि शू्न्य व्याजदरातील कर्जावर हे देश अवलंबून आहेत. या देशांचे कर्ज आणि जीडीपी यांचे गुणोत्तर 72 टक्के आहेत. मागील 18 वर्षात हे प्रमाण सर्वाधिक आहे.
आफ्रिका खंडात बहुतांश गरीब देश आहेत. इथिओपियापासून चाड आणि कांगोपर्यंत. पण या यादीत आशिया खंडातील अफगाणिस्तान आणि यमन हे देशही आहेत. या 26 देशांतील दोन तृतीयांश देश संघर्ष आणि सामाजिक कमकुवतपणाचे बळी ठरले आहेत. या कारणांमुळे देशात व्यवस्था उभ्या राहू शकल्या नाहीत. ज्यामुळे या देशात गुंतवणूक येणे पूर्ण थांबले आहे. या परिस्थितीमुळे त्यांना मंदीच्या संकटाचा वारंवार सामना करावा लागत आहे.
जागतिक बँकेच्या मुख्य अर्थतज्तज्ञ इंद्रमित गिल यांनी सांगितले की जगाचा बहुतांश भाग आता गरीबीच्या बाहेर पडला आहे. याकामी आंतरराष्ट्रीय विकास संघाने मोठं काम केलं आहे. मागील पाच वर्षांत संघटनेने वित्तीय संसाधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. आयडीएने कमी उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांत मोठी गुंतवणूक केली. या देशांना मदत केली. मागील दहा वर्षांच्या काळात नैसर्गिक संकटांनीही या देशांवर प्रतिकूल परिणाम केला. जागतिक बँकेनुसार या देशांच्या जीडीपीत वार्षिक 2 टक्के नुकसान नैसर्गिक संकटांमुळे झाले होते.
निवडणूक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची अन् चर्चा आंध्र प्रदेश विरुद्ध तमिळनाडूची; काय कनेक्शन?