मोठी बातमी, जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

मोठी बातमी, जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

World Eco Outlook : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा अंदाज वर्ल्ड इको आउटलुक आपल्या नवीन अहवालात वर्तवला आहे.  वर्ल्ड इको आउटलुकने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात भारताचा जीडीपी 4.187 ट्रिलियन डॉलर्सवर पोहचली आहे.

तर 30.507 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह अमेरिका (America) पहिल्या क्रमांकावर आहे. 19.231 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह चीन (China) दुसऱ्या स्थानावर आणि 4.744 ट्रिलियन डॉलर्स जीडीपीसह जर्मनी (Germany) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारत या यादीत आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या जपनाचा जीडीपी $4.186 ट्रिलियन आहे.

IMF

IMF ने अंदाज व्यक्त केला आहे की भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील, पुढील दोन वर्षांत 6 टक्क्यांपेक्षा जास्त विकास दर राखेल. तर जपानमध्ये 2025 आणि 2026 मध्ये फक्त 0.6 टक्के मंद वाढ अपेक्षित आहे, कारण जागतिक व्यापार मंदीचा त्याच्या निर्यात-चालित अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. भारताच्या मजबूत आर्थिक गतीमुळे जागतिक क्रमवारीत तो आणखी वर जाण्याची शक्यता आहे.

सरकारचा मोठा निर्णय, राज्यात सुरु होणार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती पुरस्कार योजना

2028 पर्यंत, देशाचा GDP 5,584.48 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तो जर्मनीच्या पुढे जाईल आणि जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube