Download App

कुस्तीपटू आक्रमक; नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी महापंचायत

New Parliament Building : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात जंतरमंतर येथे कुस्तीपटूंचे आंदोलन महिनाभर सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सांगितले की, 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीसमोर महिलांची महापंचायत बोलावण्यात आली आहे. ब्रिजभूषणच्या अटकेसाठी ही शांततापूर्ण पंचायत होईल.

28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि नव्याने बांधलेल्या संसदेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन करण्याची विनंती केली. 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभा आणि राज्यसभेने सरकारला संसदेसाठी नवीन इमारत बांधण्याची विनंती केली होती. यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली.

New Parliament : नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर ममता बनर्जींचा बहिष्कार?

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आज (23 मे) एक महिना पूर्ण झाला. 23 एप्रिलपासून ते जंतरमंतरवर पोहोचले आणि ब्रिजभूषण यांच्या अटकेसाठी आंदोलन सुरू केले. सात महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध कनॉट प्लेस पोलिस ठाण्यात लैंगिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

Tags

follow us