New Parliament : नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर ममता बनर्जींचा बहिष्कार?

New Parliament : नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर ममता बनर्जींचा बहिष्कार?

New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. पण उद्घाटन होण्यापूर्वीचं यावरुन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी केली होती. आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापासून टीएमसीने स्वतःला दूर केले आहे.

टीएमसी राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी ट्विट केले की, संसद ही केवळ नवीन इमारत नाही, ती जुन्या परंपरा, मूल्यांची स्थापना आहे. हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे समजत नाही. त्यांच्यासाठी नवीन इमारतीचे उद्घाटन हे मी आणि माझे सर्वस्व असे आहे. म्हणून त्यांच्यासोबत नाही.

UPSC 2022 Result : यूपीएससीमध्ये सारथीचा ‘डंका’, तब्बल सतरा जणांनी मारली बाजी

दुसरीकडे टीएमसी नेते सुदीप बंदोपाध्याय म्हणाले की, टीएमसी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणार आहे. टीएमसी खासदार सौगता रॉय म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांच्या वतीने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या विरोधात आहोत. आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा विचार करत असून या प्रकरणी पक्ष अंतिम निर्णय घेईल.

Whatsupp Feature : व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज चुकलाय असेल तर घाबरु नका, कारण…

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून गदारोळ सुरू आहे. या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी अनेक विरोधी पक्षांनी केली आहे. ‘भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकारमध्ये राष्ट्रपती हे केवळ प्रतीकात्मक बनले आहे’, असा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube