Whatsupp Feature : व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज चुकलाय असेल तर घाबरु नका, कारण…

Whatsupp Feature : व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज चुकलाय असेल तर घाबरु नका, कारण…

Whatsupp Feature : व्हॉट्सअप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. व्हॉट्सअपकडून एक भन्नाट फिचर लॉंच लवकरच येणार आहे. या फिचरद्वारे युजर्सला पाठवलेला मेसेज आता एडिट करता येणार आहे. यासंदर्भात व्हॉट्सअपकडून घोषणा करण्यात आली आहे.

या फिचरद्वारे युजरने सेंड केलेला मेसेज काही वेळेच्या मर्यादेत एडिट करता येणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषित केलं असून त्यांनी एक पोस्टही केली आहे.

Manohar Joshi Health Update : “पुढचे 24 तास महत्वाचे”; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

झुकरबर्ग यांनी पोस्टमध्ये लिहिलं, व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज युजर एडिट करु शकेल, व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज १५ मिनिटांच्या मर्यादेत एडिट करता येईल. युजरला मेसेज एडिट करण्यासाठी पाठवेल्या मेसेजवर प्रेस करुन होल्ड करावं लागेल. त्यानंतर पुढे एक एडिट ऑप्शन दिसेल. त्याद्वारे पाठवलेला मेसेज एडिट करता येईल.

Narendra Modi in Australia : सिडनीत PM मोदींचा डंका; सांगितली भारत-ऑस्ट्रेलिया संबंधाची “सी, डी आणि ई

विशेष म्हणजे एडिट केलेल्या मेसेजला ‘Edited’ असा टॅग लागणार आहे. त्यामुळे मेसेज वाचणाऱ्याला हा मेसेज एडिट केलेला आहे, हे समजणार आहे. टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर ही सुविधा पूर्वीपासूनच आहे. यासह Signal अॅपवरही मेसेज एडिट करता येतो.

दरम्यान, हे फिचर सर्वच युजर्ससाठी देण्यात येणार असून लवकरच हे फिचर येणार आहे. यासाठी युजर्सना वारंवार WhatsApp अपडेट करुन चेक करावं लागेल. विशेष म्हणजे Android सह iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे फिचर दाखल होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube