Narendra Modi in Australia : सिडनीत PM मोदींचा डंका; सांगितली भारत-ऑस्ट्रेलिया संबंधाची “सी, डी आणि ई
PM Modi on Australia tour : पंतप्रधान मोदींसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी 20 हजार भारतीयांनी हजेरी लावली. तसेच यावेळी ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या मंत्रिमंडळाची उपस्थित होते. यावेळी मोदींच्या नावाच्या घोषणाबाजीने सभागृह दुमदुमून गेले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज देखील उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे त्यांचं स्वागत केल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज यांचं भरभरून कौतुकही केलं.
Raavrambha: रायगडावर छत्रपतींचा आशीर्वाद घेत रावरंभांच्या टिमने दिमाखात केलं पोस्टर लाँच..
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात भारतीय सैनिक नैयन सी सैलानी यांच्या नावाने सैलानी अॅव्हेन्यु बनवण्यात आलं आहे. त्यांना पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियासाठी लढताना वीरमरण आले होते. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाचे ऐतिहासिक संबंध आहेत. त्यांचा सन्मान केल्याबद्दल मी पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार मानले.
UPSC निकाल जाहीर! इशिता किशोर देशात पहिली; तिन्ही टॉपर मुलीच
तसेच भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध स्पष्ट करायाचे झाल्यास तीन ‘सी’ बद्दल सांगावे लागेल. ज्यामध्ये कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन डी वर आधारित आहेत. डेमोक्रसी, डायसव्होरा आणि दोस्ती. तर काही लोकांनी भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन ई वर आधारित असल्याचं म्हटलं आहे. एनर्जी, इकॉनॉमी, एज्युकेशन. मात्र यापेक्षा देखील भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध मोठे आहेत. असं मोदी म्हणाले. त्यांच्या या भषणावेळी ऑस्ट्रेलियन नागरिकांनी टाळ्यांनी दाद दिली.