Download App

विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले

  • Written By: Last Updated:

Vinesh Phogat : काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) आपला पद्मश्री पुरस्कार केला होता. त्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटनेही (Vinesh Phogat) आपले पुरस्कार परत केले आहेत. विनेश फोगटे़ने महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकाच्या निषेधार्थ आपले खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाला परत करणार होती. पण त्यांना वाटेत पोलिसांनी अडवले, त्यामुळे विनेशने नाईलाजनं कर्तव्यपथावरच आपले पुरस्कार ठेवले.

Ram Mandir Ayodhya : राम मूर्ती आणि मंदिराची काही खास वैशिष्ट्ये… LetsUpp Marathi 

कुस्तीपटू बजरंग पुनियाने या घटनेचा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया साइटवर शेअर केला. त्याने लिहिलं की, कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये. देशातील महिला मल्ल अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत, बजरंग पुनियाने लिहिलं.

काँग्रेसनेही याबाबत पोस्ट टाकली आहे. कॉंग्रेसने लिहिलं की, देशासाठी लज्जास्पद दिवस. कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर आता देशासाठी पदक जिंकणारी मुलगी विनेश फोगटने आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाबाहेर ठेवला आहे. पीएम मोदी आणि त्यांच्या सरकारने त्यांच्यावर इतका अत्याचार केला की आज त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे. हे लज्जास्पद आहे, असं कॉग्रेसने म्हटलं.

आसाममध्ये नव्या पर्वाची सुरुवात, ‘ऐतिहासिक’ शांतता करार नेमका काय? 

विनेश फोगटचं पंतप्रधानांना पत्र
यापूर्वी विनेश फोगटने 26 डिसेंबर रोजी पीएम मोदींना उद्देशून एक पत्र लिहिले होते ज्यात तिने अर्जुन पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. तिने लिहिले होते की, आपलं आयुष्य सरकारच्या त्या फँसी जाहिरातींसारखे नाही, ज्यात महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या उन्नतीबद्दल बोललया जातं. तिनं लिहिले- मला ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, पण आता त्यांचा माझ्या आयुष्यात काहीच अर्थ नाही.

आमच्या तरुण महिला कुस्तीपटूंनी गेल्या काही वर्षांत खूप सहन केलं. आमचा जीव गुदमरतोय. मोदीजी, तुमच्या आयुष्यातून फक्त पाच मिनिटे काढा आणि त्या व्यक्तीने गेल्या काही दिवसांत मीडियाला दिलेली विधाने ऐका, तुम्हाला कळेल की त्याने काय केलं. तो महिला कुस्तीगीरांना ‘मंथरा’ म्हणाला. आमचा अपमान करण्याची एकही संधी त्याने सोडली नाही. याहून गंभीर बाब म्हणजे त्यांनी आतापर्यंत अनेक महिला कुस्तीपटूंना मागे हटण्यास भाग पाडले आहे. हे खुप क्लेशदायक आहे, असं विनेशने लिहिलं होतं.

…म्हणून कुस्तीपटू नाराज

माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. यामुळे संतापलेल्या साक्षी मलिकने सर्वप्रथम कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत केला. त्यांनी पीएम मोदींना पत्र लिहून आपले मतही मांडले. मात्र, नंतर सरकारने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले.

follow us