पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान पंतप्रधान मोदींचा विनेश फोगाटला फोन; ‘या’ अटी ठेवल्याने बोलण्यास नकार
Wrestler Vinesh Phogat on PM Modi phone : भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगट २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकली नाही. 100 ग्रॅम वजनामुळे सुवर्णपदकापूर्वीच विनेशला अपात्र ठरवण्यात आलं होतं. अपात्र ठरल्यानंतर विनेश चर्चेत आली होती. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन विनेशला गेला होता. (PM Modi) मात्र, विनेशने पंतप्रधान मोदींशी कॉलवर बोलण्यास नकार दिला. त्याबद्दल स्वत: विनेशने मोठा खुलासा केला आहे.
आपण एकट्याच असाल
विनेश म्हणाली या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन येत होता. त्या काळात जे काही सरकारकडून लोक असतात ते लोक मला सांगत होते मोदींचा फोन येत आहे. ते आपल्याशी बोलणार आहेत. परंतु, त्यामध्ये काही अटी आहेत. मोदी पदक विजेत्या खेळाडूंशी फोनवर बोलतात आणि त्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातो. त्यानुसार आपण एकट्याच असाल. आमच्यातील लोक आपलं फोनवर बोलण करून देतील आणि एकजण व्हिडिओ शुट करेल. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला जाईल. या गोष्टी एकून मी पंतप्रधान मोदींशी बोलण्यास नकार दिला.
Video: ‘तीन नंबरचा गाळ शेतकऱ्यांच्या पोरांना; अजित पवार समर्थक आमदाराची जीभ घसरली
विनेश पुढे म्हणाली, त्यांनी माझ्यासमोर अटी ठेवल्या. तुमचा एकही माणूस तुमच्यासोबत नसेल. आमची टीम दोन लोकांची असेल, एक व्हिडीओ शूट करेल आणि एकजण बोलून दाखवेल आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर जाईल. या सगळ्या गोष्टींमुळे मी या गोष्टीला नकार दिला. माझ्या मेहनतीची मी खिल्ली उडवणार असंही विनेश यावेळी म्हणाली आहे. कारण हा व्हिडिओ जसाच्या तसा टाकला जात नाही. तो एडिट करून टाकला जातो. त्यामुळे माझ्या भावना अशा सार्वजनिक मी करु शकत नाही असं सांगून मी बोलण्यास नकार दिला असं विनेश म्हणाली.
हे देशाने पाहिलं आहे
जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरोखरच कोणत्याही खेळाडूबद्दल सहानुभूती असेल, तर ते रेकॉर्डिंगशिवाय बोलू शकतात. कदाचित त्यांना माहित असेल की जेव्हाही ते विनेश सोबत बोलतील तेव्हा विनेश नक्कीच दोन वर्षांचा हिशेब मागेल. त्यामुळेच त्यांनी अशा अटी घातल्या असंही विनेश यावेळी म्हणाली आहे. तसंच, आपल्या भावना त्यावेळी काय होत्या हे देशाने पाहिलं आहे असंही ती म्हणाली आहे.