Video: चांगली मुलगी नोकरीवाल्याला, दोन नंबरची…; अजितदादांच्या समर्थक आमदाराची जीभ घसरली

अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

Video: 'तीन नंबरचा गाळ शेतकऱ्यांच्या पोरांना; अजित पवार समर्थक आमदाराची जीभ घसरली

Devendra Bhuyar Controversial Statement : अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चांगल्या मुली नोकरदारांना मिळतात, तर दोन नंबरच्या काळ्या मुली पानवाल्यांना मिळातात अशा आशयाचं विधान केल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या, माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्यांचा पान ठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटतो, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं नाही असं भुयार म्हणाले आहेत. दरम्यान महिलांविरोधातील या वादग्रस्त वक्तल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून, राजकीय वर्तुळातून देखील टीका केली जात आहे.

आज महात्मा गांधी जयंती! कोसो दूर अहिंसेची पाऊलवाट चालणारे बापू; काय होते जगण्याचे विचार?

देवेंद्र भुयार यांचं हे वक्तव्य हे फक्त स्त्रियांचा अवमान करणारे आहे असं नाही, हे वक्तव्य इथल्या कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या भूमीपुत्रांची टिंगल टवाळी करणारं आहे. परंतु, सध्या शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे लोक यांना बोलण्याचं काही ताळतंत्र राहिलं नाही. या लोकांना वाटतं की कोणतंच पोलीस स्टेशन आमच्यावर कारवाई करू शकत नाही. या मस्तवालपणातून अशी वाक्य येतात. पण शेतकरी आणि महिलांची टींगल करणं हाच तुमचा अजेंडा आहे का? हे एकदा अजित पवार यांना विचारले पाहिजं अशी प्रतिक्रिया शिवसेना(यूबीटी) च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

follow us