अजितदादा आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा; भुयारांची जीभ घसरताच ठाकूर भडकल्या…
Mla Yashomati Thakur Speak On Devendra Buyar : अजितदादा आणि सत्ताधाऱ्यांनो आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) सत्ताधाऱ्यांवर भडकल्या आहेत. दरम्यान, अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरलीयं. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. भुयार यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असून थेट अजित पवारांनाच आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
अमरावतीच्या मोर्शीचे अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे.#DevendraBhuyar #DevendraBhuyarcontroversialstatement pic.twitter.com/4jriJmSmSy
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 2, 2024
आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, महायुतीकडून महिलांच्या मतांसाठी जीवाचं रान केलं जात आहे. अशा परिस्थितीत महिलांचं वर्गीकरण करुन तुम्ही संंबंध महिलांचा अपमान करीत आहात, यावरुन तुमची मानसिकता काय आहे हे समजत आहे. महिला काय उपभोगाचं साधन आहे का? तुम्ही महिलांचं असं वर्गीकरण कसं करु शकता? अजितदादा तुम्ही आणि सत्ताधाऱ्यांनी आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, असं ठाकूर म्हणाल्या आहेत.
हल्ली अर्थ समजेनासा झालाय; महात्मा गांधींचा उल्लेख करत राज ठाकरेंची वाचाळवीरांना फटकार
सत्ताधारी आमदारांना बोलण्याचं ताळतंत्र राहिलं नाही – सुषमा अंधारे
सध्या शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे लोक यांना बोलण्याचं काही ताळतंत्र राहिलं नाही. या लोकांना वाटतं की कोणतंच पोलीस स्टेशन आमच्यावर कारवाई करू शकत नाही. या मस्तवालपणातून अशी वाक्य येतात. पण शेतकरी आणि महिलांची टींगल करणं हाच तुमचा अजेंडा आहे का? हे एकदा अजित पवार यांना विचारले पाहिजं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलीयं.
मराठी चित्रपटात मलायकाचा जलवा, ‘येक नंबर’ च्या टायटल साँगमधून चाहत्यांना करणार घायाळ
काय म्हणाले होते आमदार देवेंद्र भुयार?
पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या, माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्यांचा पान ठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटतो, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं नाही असं भुयार म्हणाले आहेत.
..तर मी माफी मागायला सांगणार, चंद्रकांत पाटील
अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांबाबतच्या विधानामुळे जर महिलांचा अपमान आणि भावना दुखावल्या असतील तर मी देवेंद्र भुयार यांना माफी मागायला सांगणार असल्याचं भाजपचे नेते आणि मंंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय.