हल्ली अर्थ समजेनासा झालाय; महात्मा गांधींचा उल्लेख करत राज ठाकरेंची वाचाळवीरांना फटकार

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 10 02T114607.299

Raj Thackeray Post : राज ठाकरे त्यांच्या परखड आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे सर्वांना परिचित आहेत. राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर राज ठाकरे नेहमीच व्यक्त होत असतात. आजही राज ठाकरेंनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बायोपिक येणार? तेजस्विनी पंडितच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेला उधाण

राज ठाकरेंची पोस्ट काय?

राज ठाकरेंनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, आज महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) जयंती. ‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’, असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला ‘मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर….’ याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं, हे सध्या सुरु असल्याचे राज यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे आणि हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा असा सल्ला राज यांनी दिला आहे.

आज महात्मा गांधी जयंती! कोसो दूर अहिंसेची पाऊलवाट चालणारे बापू; काय होते जगण्याचे विचार?

गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल असे राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन असे राज यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिलं

राज ठाकरेंनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही अभिवादन केले आहेत. या पोस्टमध्ये ते म्हणतात की, लालबहादूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण ह्या २ वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची, कृषीक्रांतीची बीज रोवली, पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिलं. ह्या राष्ट्रपुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

follow us