मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बायोपिक येणार? तेजस्विनी पंडितच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेला उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बायोपिक येणार? तेजस्विनी पंडितच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेला उधाण

Raj Thackeray Biopic : आतापर्यंत रुपेरी पडद्यावर अनेक व्यक्तींचे जीवनपट उलगडणारे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांचा जीवनपट या बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अनोखं स्थान निर्माण करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सध्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितसोबत सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे राज ठाकरे यांच्या या बायोपिकच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini pandit) करणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini 🕊️🧿 (@tejaswini_pandit)

सध्या एक फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत असून त्याची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याचे तर्क- वितर्क काढले जात आहेत. ⁠राजसाहेब ठाकरे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे एक गृहस्थ अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोबत नुकतेच पाहाण्यात आले. राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता लागली आहे. चित्रपट नेमका काय असणार? कोण कलाकार असणार? अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती- तेजस्विनी पंडितची भूमिका यापैकी नेमकी कोणती? हे गुपित काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज यांची भूमिका कोण साकारणार?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील बायोपिकमध्ये कोणता स्टार त्यांची भूमिका साकारणार याची चर्चा रंगताना दिसत आहे. याअगोदर राज यांच्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या व्यक्तीरेखेत राजेश श्रृंगारपुरे पाहायला मिळाले होते. मात्र, या सिनेमात कोणता स्टार ही भूमिका साकारणार याची मोठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ⁠शिवाय, या सिनेमातील इतर स्टारकास्टबाबत आणखी माहिती समोर आली नाहीय.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने याअगोदर अनेकदा सोशल मीडियावर राज ठाकरे यांनी अनके विविध प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. तिच्या ट्वीटने अनेकांनी तिचे तोंडभरून कौतुक केले होते. तर, जोरदार टीका देखील सहन करावी लागली होती.

Tejaswini Pandit: जबरदस्त! मराठमोळ्या अभिनेत्रीची साऊथमध्ये एन्ट्री, सिनेमातील फर्स्ट लूक आऊट

बायोपिकची कथा काय?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत आपला राजकीय प्नवासाला सुरूवात केली होती. बालवयापासून राज हे बाळासाहेबांसोबत राज्याच्या दौऱ्यावर सोबत असायचे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन केला. राजकीय क्षेत्रात चौफेर फटकेबाजी करणारे राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार, कलाप्रेमी आहेत. त्यामुळे त्यांच्या बायोपिकमध्ये कोणत्या घटना असणार, राजकीय गौप्यस्फोट होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube