Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी अरविंद केजरीवाल जंतर-मंतरवर, म्हणाले…

Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल देखील आंदोलक कुस्तीपटूची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. जंतरमंतर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, जो देशासोबत आहे तो या कुस्तीपटूंसोबत उभा आहे. ते पपुढे म्हणाले की कुस्तीपटूंना फक्त एफआयआरसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. ज्यांचं देशावर प्रेम आहे, […]

Brij Bhushan Sharan Singh (2)

Brij Bhushan Sharan Singh (2)

Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल देखील आंदोलक कुस्तीपटूची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. जंतरमंतर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, जो देशासोबत आहे तो या कुस्तीपटूंसोबत उभा आहे.

ते पपुढे म्हणाले की कुस्तीपटूंना फक्त एफआयआरसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. ज्यांचं देशावर प्रेम आहे, त्यांनी सुट्टी घेऊन येथे यावे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहावे. हे सहन करण्यासाठी त्यांनी देशाचं नाव उंचावलं नाही. असं देखील ते यावेळी म्हणाले.

आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीही कुस्तीपटूंना भेटण्यासाठी पोहोचल्या. प्रियांका गांधी यांनी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

कर्नाटक निवडणुकीत आरोप- प्रत्यारोपांची राळ; मोदी म्हणाले, काँग्रेसकडून मला 91 वेळा शिवीगाळ

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, ” सरकार सांगत आहे की दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची प्रत अद्याप मिळालेली नाही, जेणेकरून त्यात कोणत्या कलमांचा समावेश आहे हे कळू शकेल. एफआयआर नोंदवला असेल तर दाखवावा. या व्यक्तीवर अनेक गंभीर आरोप आहेत. तो व्यक्ती त्या पदावर असताना चौकशी करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा.”

स्तीपटूंच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. विरोधी पक्ष देखील यात उतरला आहे. भाजपचे खासदार असलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो आणि खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version