Download App

Anurag Thakur Meets Wrestler: केंद्र सरकार नरमले, कुस्तीपटूंवरील FIR मागे घेणार, मंत्री अनुराग ठाकूरसोबत कुस्तीपटूंची चर्चा

  • Written By: Last Updated:

Anurag Thakur Meets Wrestler: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग ( Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेसाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी बुधवारी (7 जून) क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur) यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री आणि कुस्तीपटूंमध्ये सुमारे 5 तास बैठक चालली. अनुराग ठाकूर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. (wrestlers-protest-players-meets-sports-minister-anurag-thakur-government-accepted-many-demands-bajrang-punia-sakshi-malik)

कुस्तीपटूंचे आंदोलन संपवण्यासाठी सरकारने तोडगा म्हणून खेळाडूंना चर्चेसाठी बोलावले होते. भाजप खासदार आणि डब्ल्यूएफआयचे निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटू करत आहेत. या भेटीनंतर अनुराग ठाकूर म्हणाले की, मी खेळाडूंना चर्चेसाठी आमंत्रित केले होते, सकारात्मक चर्चा झाली आहे.

बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांवर क्रीडामंत्र्यांनी सांगितले की- पोलिसांनी 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करावे, कुस्ती महासंघाच्या निवडणुका 30 जूनपर्यंत पूर्ण कराव्यात, कुस्ती महासंघाच्या निवडणुका होईपर्यंत आयोगाच्या समितीत दोन जणांची नावे प्रस्तावित केले आहे. याशिवाय महिला खेळाडूंना सुरक्षा देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. 15 जूनपर्यंत कोणतेही निदर्शने किंवा आंदोलन करणार नसल्याचे पैलवानांनी सांगितले आहे.

Brijbhushan Life Story : स्वतःच्या मुलानेही बापाला धरले होते आत्महत्येसाठी जबाबदार

या बैठकीनंतर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक म्हणाले की, आमच्या सरकारसोबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. खेळाडूंवरील सर्व खटले मागे घेण्यात येतील. आमच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, पण आणखी काही मागण्या आहेत ज्यावर सरकारशी आमचे मतभेद आहेत. आम्हाला आशा आहे की लवकरच त्या गोष्टी देखील तोडगा निघेल.

या बैठकीला टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आणि तिचा कुस्तीपटू पती सत्यव्रत कादियान उपस्थित होते. कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बैठकीत सहभाग घेतला नाही.

Tags

follow us