दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर करण्यात आलेल्या कारवाईची दिल्ली महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलीय. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कुस्तीपटूंसह त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई केलीय, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलीय. यासंदर्भात पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी त्यांनी पत्र लिहिलं आहे.
सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर… मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
स्वाती मालीवाल म्हणाल्या, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली आणि त्यांना आज जबरदस्तीने ताब्यात घेतले. हे पाहून दिल्ली महिला आयोगाला खूप दुःख झाले आहे.
पाकिस्तानकडून धोका! संतापलेल्या ‘आयएमएफ’ने पाकिस्तानला दिले ‘हे’ दोन पर्याय
एका महिन्यापूर्वी, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर, त्यांच्याविरूद्ध या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवण्यात आले. त्यांच्यावर आधीच 40 चालू गुन्हेगारी खटले चालू आहेत.
अमेरिकेतही भारतीय सणांचा डंका; खासदाराने केली थेट राष्ट्रीय सुट्टीची मागणी
महिला कुस्तीपटू, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि संगिता फोगट या सर्व देशाच्या चॅम्पियन आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचं नाव कमावले आहे. त्यामुळे ब्रिजभूषुण सिंह यांना तातडीने अटक करण्यात यावी, तसेच महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांची दिल्ली पोलिसांनी तात्काळ सुटका करुन त्यांना ताब्यात घेण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केलीय.
दरम्यान, अल्पवयीन मुलीने खासदारावर लैंगिक छळाचा आरोप करूनही दिल्ली पोलिसांना आजपर्यंत त्यांना अटक केली नाही. अटक करण्यात अपयश आले आहे. यामुळे महिला कुस्तीपटूंना गेल्या महिनाभरापासून जंतरमंतरवर आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. दिल्लीत, दररोज सुमारे 6 लैंगिक अत्याचाराची प्रकरणे नोंदवली जातात आणि प्रत्येक प्रकरणात दिल्ली पोलिस आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करतात. मग आजपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक का झाली नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.