अमेरिकेतही भारतीय सणांचा डंका; खासदाराने केली थेट राष्ट्रीय सुट्टीची मागणी

अमेरिकेतही भारतीय सणांचा डंका; खासदाराने केली थेट राष्ट्रीय सुट्टीची मागणी

Diwali Holiday in America : अमेरिकन खासदार ग्रेस मेंग यांनी शुक्रवारी (दि.26) अमेरिकेत दिवाळीचा सण राष्ट्रीय सुट्टी (national holiday) म्हणून घोषित करण्याची मागणी करणारे विधेयक सादर केले. त्या म्हणाल्या की, जगभरातील अब्जावधी लोकांसाठी तसेच न्यूयॉर्क (New York)आणि युनायटेड स्टेट्समधील असंख्य कुटुंबांसाठी आणि समुदायांसाठी दिवाळी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे.

आधी पालकमंत्रीपदावरुन डावललं; मग प्रभारीपद काढून घेतलं; महाजनांचे पंख कोणी छाटले?

दिवाळी दिवस अधिनियमाला संसद (Parliament)आणि राष्ट्रपतींच्या (President)मान्यतेनंतर हा कायदा बनणार आहे. असं झाल्यास, दिवाळीची सुट्टी अमेरिकेतील 12 वी फेडरल सुट्टी असेल. फक्त दिवाळीच नाही तर नवीन वर्ष आणि ईद यांसारख्या इतर सणांसाठीही मेंग यांनी असेच प्रयत्न करण्याचा आग्रह धरला आहे.

ग्रेस सध्या न्यू यॉर्कच्या क्वीन्स जिल्ह्यासाठी यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सहाव्यांदा काम करत आहेत. न्यूयॉर्कमधील काँग्रेसच्या त्या पहिल्या आणि एकमेव आशियाई अमेरिकन सदस्य आहेत. मेंगचा जन्म एल्महर्स्ट, क्वीन्स येथे झाला आहे. त्यांनी येशिवा विद्यापीठाच्या बेंजामिन कार्डोझो स्कूल ऑफ लॉमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

त्या फेडरल सरकारी कार्यक्रम आणि क्रियाकलापांच्या निधीवर देखरेख करणार्‍या हाउस ऍप्रोप्रिएशन कमिटीवर न्यूयॉर्कच्या वरिष्ठ डेमोक्रॅट (New York’s senior Democrat)आहेत. त्या काँग्रेसच्या आशियाई पॅसिफिक अमेरिकन कॉकसच्या पहिल्या उपाध्यक्षा म्हणून देखील काम करतात, ज्यात आशियाई अमेरिकन आणि पॅसिफिक आयलँडर (Pacific Islander)सदस्य असतात.त्या त्यांच्या समुदायांच्या हितासाठी वकिली करतात.

याशिवाय, त्या LGBTQ समानता कॉकसच्या उपाध्यक्षा आहेत,त्या समलैगिक समुदायाच्या हक्क आणि हितसंबंधांसाठीचे समर्थन करतात आणि कॉंग्रेस टास्क फोर्स ऑन अँटी-सेमिटिझमच्या सह-अध्यक्ष आहेत.ज्यू समुदायाला द्वेषापासून वाचवण्यासाठी त्या काम करतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube