Download App

एक डील अन् Yes Bank च्या शेअरची उसळी; वर्षभरात गुंतवणुकदारांचे पैसे केले डबल

Yes Bank Share : एस बँकेच्या शेअरमध्ये ( Yes Bank Share) होणारी वाढ सुरूच आहे. आठवड्यातील तिसऱ्या दिवशी देखील शेअर मार्केट (Share Market) सुरू होताच या शेअरमधील वाढीचा कल कायम दिसत आहे. तर आतापर्यंत एस बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्के वाढ झाली. आहे. गेल्या वर्षभरातील या शेअरच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं. तर गेल्या वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांची रक्कम डबल केली आहे. तसेच नुकतेच काही दिवसांपासून हे शेअरची किंमत दररोज वाढत आहे. यामागे एक डील कारणीभूत ठरली आहे.

अहमदनगरमध्ये जिल्हाध्यक्षांचाच काँग्रेसला मोठा धक्का; नागवडे दाम्पत्य राष्ट्रवादीच्या वाटेवर

एचडीएफसी बँकेने एस बँकेमध्ये भागीदारी मिळवण्यासाठी एक डील केली आहे. गेल्या आठवड्यात सोमवारीच भारतीय रिझर्व बँकेने एचडीएफसीला एस बँकेमध्ये 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्याची मंजुरी दिली. त्यानंतर या कंपनीच्या शेअरने उसळी घेतली आहे. बुधवारी या शेअरमध्ये 52 आठवड्यातील सर्वात उच्चांक गाठला होता. त्यावेळी या शेअरची किंमत 30.45 रुपये एवढी झाली होती. त्यानंतर आज देखील या शेअरची किंमत वाढतच आहे.

हजूर साहिब गुरुद्वाराचा निर्णय अन् रडारवर आले CM शिंदे; नेमकं काय घडलं?

किंमती बरोबरच या शेअरचे मार्केट कॅप्टलायझेशन देखील वाढलं आहे. ते आता एकूण 80 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे ऑक्टोबर 2023 मध्ये 15. 95 पैशांना असलेला हा शेअर चारच महिन्यांमध्ये 30.45 रूपयांवर गेल्याने गुंतवणूकदारांचे पैसे डबल झाले आहे. त्याचबरोबर एचडीएफसीने केलेल्या डीलमुळे या शेअरमध्ये सकारात्मक बदल होण्याचे अपेक्षा शेअर मार्केट मधील तज्ज्ञ देखील व्यक्त करत आहेत.

RBI Policy : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रेपो रेट राहणार जैसे थे; EMI वाढणार नाही

दरम्यान दुसरीकडे सध्या शेअर मार्केटमध्ये चढ-उतार सुरूच आहे. करण बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. ज्यामुळे दोन्ही निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले. यामध्ये बीएसईचा सेन्सेक्स 0.47% च्या उसळीसह 72,527.76 वर उघडला होता. तर एनएसईची निफ्टी 0.51 टक्क्यांच्या उसळीसह 22,042.30 वर उघडली होती. मात्र दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळालं होतं.

follow us