Download App

Asad Ahmed Encounter: गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाचं एन्काउंटरवर योगींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  • Written By: Last Updated:

उत्तरप्रदेशमधील उमेश पाल खून प्रकरणातील फरार आरोप आणि गँगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथींदार गुलाम यांच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.

सीएम योगींनी यूपी एसटीएफचे कौतुक केले. गृह खात्याचे सचिव संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना या चकमकीची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला होता.

Nitin Gadkari Threat : आरोपी जयेश पुजारीवर युएपीए कायद्यांतर्गत कारवाई…

दरम्यान उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदच्या मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या दोघांवरही पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे झालेल्या चकमक या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे. पोलिसांची या दोघांजवळून विदेशी शस्त्रे जप्त केल्याचा दावा केला आहे. अतिक अहमद मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

 

कारवाईदरम्यान STF ने अतिक अहमद आणि त्याच्या साथीदाराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, परंतु असद आणि गुलाम यांनी एसटीएफच्या पथकावर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला पथकाकडूनही दोख प्रत्युत्तर देण्यात आले. यात दोघांचा मृत्यू झाला. ठार झालेल्या दोघांवरही प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. उमेश पाल यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यापासून असद आणि गुलाम फरार होते.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

Tags

follow us