Download App

भाजपच्या महिला खासदाराचा विवाह वादात, एका युवकाने केला पती असल्याचा दावा

Sangamitra Maurya : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) आणि त्यांची कन्या भाजप खासदार संघमित्रा मौर्य (Sangamitra Maurya) एका नव्या वादात अडकल्याचे दिसत आहे. लखनऊ येथील दीपक कुमार स्वर्णकर नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फसवणूक आणि मारहाणीचा आरोप केला आहे. या प्रकरणी एमपी एमएलए न्यायालयाने संघमित्रा आणि स्वामी प्रसाद यांच्यासह पाच जणांना 6 जानेवारी रोजी न्यायालयात बोलावले आहे. घटस्फोट न घेता संघमित्रा मौर्य यांनी दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे.

लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये राहणारे दीपक कुमार स्वर्णकर म्हणतात की, त्यांचे लग्न संघमित्रा मौर्य यांच्याशी झाले होते आणि संघमित्राने घटस्फोट न घेता पुन्हा लग्न केले. संघमित्रा यांनी त्यांच्या 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःला अविवाहित असल्याचा दावाही केला, पण तो खोटा आहे. तसेच स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह अन्य पाच जणांवर जीवे मारण्याची धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

PM मोदींच्या उपस्थितीत वर्ल्डकपची ग्रँड फायनल! जोडीला वायुसेनेचा एअर शो अन् प्रीतमचे LIVE Music

घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचा आरोप
दीपकच्या तक्रारीवरून, घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याच्या आणि निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून एमपी एमएलए न्यायालयाने संघमित्रा यांना या प्रकरणात समन्स बजावले आहे, तर स्वामी प्रसाद मौर्य यांना प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी कट या कलमांखाली हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी 6 जानेवारीला होणार आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप नंतर लग्न
दीपक स्वर्णाकर सांगतात की ते 2016 पासून संघमित्रा मौर्यसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. संघमित्राने सांगितले होते की, त्यांचा पहिल्या लग्नापासून घटस्फोट झाला आहे. त्यानंतर 2019 मध्ये दीपक आणि संघमित्राचे घरीच लग्न झाले, मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संघमित्राने निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःला अविवाहित घोषित केले. नंतर कळले की संघमित्राचा 2021 मध्ये घटस्फोट झाला होता.

सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, तब्येत स्थिर

न्यायालयाने 6 जानेवारीला समन्स बजावले
फिर्यादीने सांगितले की, 2021 मध्ये त्यांनी संघमित्रासोबत कायद्यानुसार लग्न करण्यास विचारले असता स्वामी प्रसाद मौर्य यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनेकवेळा हल्ला केला आणि मारहाण केली. दीपकने न्यायालयात साक्षीदाराचा जबाबही नोंदवला आहे. या प्रकरणी संघमित्रा मौर्य आणि स्वामी प्रसाद मौर्य, त्यांची पत्नी शिवा मौर्य, मुलगा उत्कर्ष मौर्य यांच्यासह सर्व आरोपींना कोर्टात समन्स बजावण्यात आले आहे.

Tags

follow us