Download App

मुख्यमंत्र्यांचा 100 कोटींचा घोटाळा – आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

  • Written By: Last Updated:

नागपूर : नागपूर न्यास जमीन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जमीनीचे वाटप झालं कसं? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. यावरुनच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

काही लोकं मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी ही जमीन 16 लोकांना दोन कोटी रुपयांत दिली. या जमीनीची मुळ किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे. न्यायप्रविष्ट NIT ची जमीन कोणत्याही सामन्या नागरिकांना न कळवता जमीन देता येते का? हा पहिला प्रश्न आहे. न्यायप्रविष्ट जमीन नगरविकास मंत्र्यांना देता येते का? हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. हे स्पष्ट दिसतंय, अशी टीका जितेंद्र आव्हाड केली आहे.

Tags

follow us