Download App

‘फडणवीसांची पोलिस दलावर पकड नाही’ : Nana Patole यांचा हल्लाबोल…

काँग्रेसच्या ( Congress )  महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव ( Pradnya Satav )  यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )  यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadavis )  यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांचा पोलिस दलावर वचक दिसत नाही, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर आहे. यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच खुलेआम दादागिरी करत आहेत, हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते, गोळीबार केला जातो पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतली आहे, असे पटोले म्हणाले आहेत. लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमासाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनीधींनी काम कसे करायचे? पोलीस दल व इतर सरकारी यंत्रणा काय फक्त विरोधी पक्षांचे नेते व लोकप्रतिनीधींवर कारवाई करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत आहे का?, असा सवालही पटोलेंनी उपस्थित केला.

दरम्यान पोलिसांनी पोलिसांनी संबंधित हल्लेखोराला अटक केली असून महिंद्र असं या हल्लेखोराचं नाव आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा गावात घडली आहे. माझ्यावर हा हल्ला पूर्वनियोजित असून, महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे प्रज्ञा सातव यांनी म्हटले आहे.

Tags

follow us