मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. आता त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हा ट्विटरचा प्रोफाईल फोटो ठेवला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचे आम्ही सगळे मावळे आहोत.त्यांच्या विचारांशी प्रतारणा होत असेल तर ती आम्ही पहात राहू शकत नाही. #शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे तमाम जनतेला देतो. pic.twitter.com/42Z5bwqrUz
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 17, 2023
त्याच बरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर एक ट्विट देखील केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचे आम्ही सगळे मावळे आहोत.त्यांच्या विचारांशी प्रतारणा होत असेल तर ती आम्ही पहात राहू शकत नाही. #शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे तमाम जनतेला देतो.’ असं ट्विट देखील त्यांनी केलं आहे.
Raju Shetti : रावणाने धनुष्य उचललं, पण मतदार श्रीरामाच्या रूपात येतील…
केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपने साथ दिली. शिंदे यांचा वापर करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोंडीत पकडले. आता पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदेंकडे गेल्याने ठाकरे यांन राजकीयदृष्ट्या धक्का देण्यात भाजपला यश आले आहे. राजकीयदृष्ट्या बुलडोझरच फिरविण्यात आल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.