Download App

Ncp Crisis : साहेबांची ‘ही’ गुगली असेल तर 4 वर्षांनी कळेल, दादांच्या आमदाराचं मोठं विधान…

Ncp Crisis : शरद पवार साहेबांची ही गुगली असेल तर 4 वर्षांनी कळणार असल्याचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लहामटे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कारण पहाटेच्या शपथविधीबाबत तब्बल तीन वर्षांनी शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता ही गुगली कळायला 4 वर्ष लागणार असल्याचं लहामटे यांनी स्पष्ट केलं आहे.

Video : पुरामुळे नागरिकांचे हाल! संतप्त महिलेने आमदाराच्या थेट कानशिलातच लगावली…

आमदार लहामटे म्हणाले, सुरुवातील मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आधी मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करुनच घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मतदारसंघाच्या विकासासाठी अजित पवार गटाची साथ दिली तर काही अडचण नसल्याचं मतदारांनी सांगितलं होतं. त्यानंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामिल होण्याचा निर्णय घेतल्याचं लहामटे यांनी स्पष्ट केलं आहे.

Faf Du Plessis Birthday: क्रिकेट विश्वाचा ‘राजा’ ज्याला क्रिकेट बोर्ड सक्तीने निवृत्त करतंय

तसेच मी आता अजितदादांची साथ देत आहे. साहेबांची साथ सोडल्याने मनात दुख वाटतंय, पण दादांना भेटल्यानंतर ते म्हणाले आम्ही कुठं साहेबांना सोडलंय, मागे एकदा पहाटेच्या शपथविधीदरम्यान माझं आणि साहेबांशी फोनवर संभाषण झालं होतं. त्यानंतर साहेबांनी ही माझीच गुगली असल्याचं तीन वर्षांनंतर सांगितलं होतं. आता ही साहेबांची गुगली आहे की नाही, हे कळायला 4 वर्षांचा कालावधी जाणार असून तोपर्यंत आमदारकीची दुसरी टर्मही निघून जाईल, त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी राजकारण केलं पाहिजे, या मताचा मी असल्याचं लहामटेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीत तिकीट देण्याचं आश्वासन अजिदादांनी दिलं असल्याचं आमदार लहामटेंनी स्पष्ट केलं असून जर तिकीटाच प्रश्न असता तर मी दादांच्या गटात गेलो नसतोच, असंही लहामटेंनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर सुरुवातील आमदार लहाटमटे अजित पवारांसोबत राजभवनात दिसून आले होते. त्यानंतर आपली भूमिका होल्ड ठेवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधून मगच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी शरद पवारांचा हात धरला खर पण लगेचच त्यांनी युटर्न घेत अजित पवार गटाला समर्थन दिलं होतं.

Tags

follow us