‘आरोग्य विभागात बदल्यांचं मोठं रॅकेट सुरु’; विजय वडेट्टीवारांनी सगळंच केलं उघड

Vijay Wadettivar News : राज्याच्या आरोग्य विभागात बदल्यांचं मोठं रॅकेट सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केला आहे. या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात (Winter session) विजय वडेट्टीवार यांनी आवाज उठविला आहे. अधिवेशनानंतर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते. 20 Years: अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला पूर्ण झाली 20 […]

Vijay Wadettivar Health

Vijay Wadettivar Health

Vijay Wadettivar News : राज्याच्या आरोग्य विभागात बदल्यांचं मोठं रॅकेट सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केला आहे. या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात (Winter session) विजय वडेट्टीवार यांनी आवाज उठविला आहे. अधिवेशनानंतर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते.

20 Years: अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला पूर्ण झाली 20 वर्ष! अभिनेता पोस्ट लिहीत म्हणाला…

विजय वडेट्टीवार म्हणाले, हिवाळी अधिवेशनात आम्ही आरोग्य विभागातील भ्रष्टाचार उघड केला आहे. आरोग्य विभागात बदल्याचं रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पैसे घेतल्याशिवाय बदल्या होत नाहीत. नियम लावून पदोन्नती केली जाते. नागपूरच्या उपसंचालकाची बदली केली नंतर ती रद्द केली. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे.

तसेच आरोग्य विभागात 1200 डॉक्टरांची बदली नियमबाह्य करण्यात आली आहे. या बदल्यांच्या सत्रात जवळपास 50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावाही विजय वडेट्टीवारांनी केला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन संचालकांची पदे रिक्त रहावीत असं झालं आहे हे दुर्देवी असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Ram Mandir Trust कडून आधी नकार आता निमंत्रण; जोशी-अडवाणी लावणार प्राणप्रतिष्ठेला हजेरी

आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा :
राज्याच्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचं सध्या दिसत आहे. ज्या रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी योजना सुरु करायची आहे, त्यासाठीही 40 ते 50 हजार रुपये मागितले जात असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. ही योजना लोकांच्या सेवेसाठी आहे की पोट भरण्यासाठी असा सवाल उपस्थित होत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

T20 League : धोनी कोणावर लावणार कोट्यवधींची बाजी? जाणून घ्या, पडद्यामागच्या लिलावाचा खेळ

अधिवेशनाच्या कामकाजावरही ताशेरे…
अधिवेशन किमान तीन आठवडे चालवलं जावं, अशी आमची मागणी आहे. विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी गुरुवार आणि शुक्रवार यावर चर्चेसाठी दोन दिवस वाढवा, अशी मागणी होती पण सरकारला विदर्भातील लोकांचं ऐकायचंच नाहीये. आम्ही आग्रह केला तरीही उद्या संध्याकाळी हे अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न होत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Exit mobile version