T20 League : धोनी कोणावर लावणार कोट्यवधींची बाजी? जाणून घ्या, पडद्यामागच्या लिलावाचा खेळ

  • Written By: Published:
T20 League : धोनी कोणावर लावणार कोट्यवधींची बाजी? जाणून घ्या, पडद्यामागच्या लिलावाचा खेळ

T20 League: टी 20 क्रिकेट स्पर्धांच्या लिलावाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा हा लिलाव प्रथमच देशाबाहेर आयोजित केला जात आहे. या लिलावाला आज ( दि.19) दुपारपासून सुरूवात होणार आहे. आजच्या लिलावात एकूण 333 खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. परंतु, आजच्या लिलावात जास्तीत जास्त 77 खेळाडूंचीच विक्री करता येणार आहे. त्यामुळे आता कोणता संघ नेमक्या कोणत्या खेळाडूंना विकत घेणार आणि कॅप्टन कूल धोनी कुणावर (MS Dhoni) कोट्यवधींचा सट्टा लावणार यासह कुठला खेळाडू महत्त्वाचा आहे लिलावाचं खरा खेळ नेमका काय हे आपण जाणून घेऊया.

School Time : बच्चे कंपनींसाठी गुड न्यूज! आता सकाळच्या साखर झोपेत ‘नो डिस्टर्बन्स’; केसरकरांची मोठी घोषणा

किती लावली जाणार बोली?

दुबईमध्ये आज होणाऱ्या 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. ज्यामध्ये सर्व संघ मिळून 262.95 कोटी रुपये खर्च करू शकतील. जरी बोली 333 खेळाडूंवर लावली जाणार असली तरी, लिलावात जास्तीत जास्त 77 खेळाडूंसोबतच करार करू शकणार आहे.

चेन्नईला नेमकं काय हवंय?

चेन्नईकडे 31.40 कोटी रुपये असून, संघात एकूण 6 खेळाडूंची जागा रिक्त आहेत. त्यापैकी 3 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.आजच्या लिलावात संघासमोर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेल्या यंदाच्या हंगामासाठी अंबाती रायडूची रिप्लेसमेंट शोधण्याचं आव्हान असेल. याशिवाय चेन्नईला परदेशी वेगवान गोलंदाज आणि भारतीय वेगवान गोलंदाजांची गरज असून, लिलावादरम्यान विदेशी अष्टपैलू खेळाडूंला संधी देण्यावरही भर असेल.

हार्दिक पांड्याची अट अन् रोहितची विकेट, पडद्यामागील सत्य आले बाहेर

मुंबई काय करणार?

या लिलावात मुंबईकडे 17.75 कोटी रुपये असून, संघात 8 जागा रिक्त आहेत. यात संघाचा फोकस हा 4 परदेशी खेळाडू खरेदी करण्याकडे असू शकतो. एकूण परिस्थिती बघाता संघाला दोन विदेशी वेगवान गोलंदाजांची सर्वाधिक गरज आहे. त्यातही एखाद खेळाडू अष्यपैलू असल्यास संघाला फायदा होणार आहे.

गुजरातची कशी असेल रणनीती?

आजच्या लिलावात गुजरातकडे सर्वाधिक 38.15 कोटी रुपयांची रक्कम असून, सध्या संघात 8 खेळाडूंची जागा रिक्त आहे. आजच्या लिलावात संघ दोन परदेशी खेळाडू खरेदी करू शकते. ऐन मोसमाच्या तोंडावर हार्दिक पांड्याने संघाला रामराम केल्याने त्याच्या जागी पर्याय शोधण्याचे आव्हान संघासमोर असेल. याशिवाय संघाला ऋद्धिमान साहाला पर्याय ठरू शकणारा परदेशी वेगवान गोलंदाज आणि स्थानिक यष्टिरक्षकाचीही गरज आहे. आता यासाठी संघ कुणाची निवड करतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोलकात्याला कुणाची गरज?

आजच्या लिलावासाठी कोलकाताकडे 32.70 कोटींची रक्कम असून, संघाला 12 खेळाडूंची गरज आहे. लिलावादरम्यान संघ जास्तीत जास्त 4 परदेशी खेळाडू खरेदी करू शकणार आहेत. आजच्या घडीला कोलकाता संघाला दोन विदेशी वेगवान गोलंदाजांची गरज असून, यापैकी एक अष्टपैलू खेळाडू खेरेदी करण्याकडे संघाचा फोकस असेल. याशिवाय एका भारतीय यष्टीरक्षकाची गरज आहे.

बंगळुरू कुणावर लावणार बोली?

लिलावासाठी बंगळुरूकडे 23.25 कोटींची रक्कम असून, संघाला 6 खेळाडूंची गरज आहे. जास्तीत जास्त 3 परदेशी खेळाडू खरेदी करू शकते. वानेंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांच्या बदलीची गरज आहे. याशिवाय संघाला जोश हेझलवूडच्या जागी बदली खेळाडूची गरज आहे. याशिवाय बंगळुरू संघाला एका भारतीय अष्टपैलू खेळाडूचीही गरज आहे.

हैदराबादच्या नजरेत कोणते खेळाडू?

हैदराबादकडे लिलावासाठी 34 कोटींची रक्कम आहे. संघात 6 खेळाडूंची जागा रिक्त असून, या रिक्त जागांवर संघ 3 परदेशी खेळाडूंना खरेदी करू शकते. हैदराबादला परदेशी अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. याशिवाय संघाला भारतीय फलंदाज आणि परदेशी लेगस्पिनरचीदेखील गरज आहे.

Madras High Court : धोनीवर आरोप करणं भोवलं; IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांचा तुरूंगवास

दिल्ली कुणावर बाजी लावणार?

दुबईत पार पडणाऱ्या लिलावासाठी दिल्लीच्या पर्समध्ये एकूण 28.95 कोटींची रक्कम आहे. संघात नऊ खेळाडूंची जागा रिक्त असून, ज्यामध्ये जास्तीत जास्त 4 परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. दिल्लीला परदेशी अष्टपैलू खेळाडू, भारतीय यष्टीरक्षक आणि भारतीय फलंदाजाची गरज आहे जो गेम फिनिशर म्हणून संघासाठी खेळेल.

पंजाबला हवाय वेगावान अष्टपैलू खेळाडू

पंजाबच्या पर्समध्ये 29.10 कोटी रुपये असून, संघ जास्तीत जास्त 8 खेळाडू खरेदी करू शकतो. ज्यात 2 परदेशी खेळाडू आहेत. अन्य संघांसह पंजाबही वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूचा शोधात आहे.

धारावीसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मोडमध्ये; ऑफिस तुमचं असलं तरी रस्ते आमचे

राजस्थानचं कसं असेल गणित?

राजस्थानकडे आजच्या लिलावासाठी 14.50 कोटी रुपये आहेत आणि 8 खेळाडूंची जागा रिक्त आहे. राजस्थान संघ जास्तीत जास्त 3 परदेशी खेळाडू खरेदी करू शकतो. राजस्थानला परदेशी फलंदाज आणि अष्टपैलू फलंदाजांची गरज आहे.

लखनौला हवाय भारतीय अष्टपैलू खेळाडू

लिलावासाठी लखनौकडे सर्वात कमी 13.15 कोटींची रक्कम असून, संघाला 2 परदेशी खेळाडूंसह एकूण 6 खेळाडूंची गरज आहे. याशिवाय संघाला भारतीय अष्टपैलू खेळाडूचीही गरज आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube