MS Dhoni Birthday: हौसेला मोल नाही, चाहत्यांनी धोनीला दिले खास गिफ्ट

  • Written By: Published:
MS Dhoni Birthday: हौसेला मोल नाही, चाहत्यांनी धोनीला दिले खास गिफ्ट

MS Dhoni Birthday: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा उद्या म्हणजेच 7 जुलै रोजी 42 वा वाढदिवस आहे. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीचे खूप चाहते आहेत. धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. यावेळी चाहत्यांना धोनीच्या वाढदिवसात कोणतीही कसर सोडायची नाही. धोनीला त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशातील चाहत्यांकडून एक खास भेट मिळाली आहे. (Ms Dhoni Birthday Fans Made Biggest 77 Feet Cut Out for Ms Dhoni In Andra Pradesh For His 42 Birthday)

आंध्र प्रदेशमध्ये चाहत्यांनी धोनीचा सर्वात मोठा कटआउट लावला आहे. या कटआउटची लांबी 77 फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी, सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की संपूर्ण जगातील कोणत्याही क्रिकेटरचा हा सर्वात मोठा कटआउट आहे. या कटआउटचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नुकत्याच झालेल्या IPL 2023 मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जची कमान सांभाळताना दिसला. धोनीने आपल्या नेतृत्वात संघाला विजयी केले होते. आयपीएलच्या 16व्या हंगामात चेन्नई पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनले. धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 250 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 218 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 38.79 च्या सरासरीने आणि 135.92 च्या स्ट्राइक रेटने 5082 धावा केल्या. यादरम्यान त्याने 24 अर्धशतके झळकावली आहेत.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

टीम इंडियाने शेवटची 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 144 डावांमध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत.

याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50.58 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये धोनीने 37.6 च्या सरासरीने आणि 126.13 च्या स्ट्राइक रेटने 1617 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 16 शतके झळकावली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube