Aaditya Thackery : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिल्लीहुन कायदा लिहुन घेतला असल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल दिला. हा निकाल देतांना त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरवला. दरम्यान, या निकालानंतर ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे.
मोठी बातमी! गोगावलेंचा अवैध व्हीप नार्वेकरांनी कसा ठरवला वैध?; स्वतःच केला खुलासा
आदित्य ठाकरे म्हणाले, अपात्र आमदार प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला कालचा निकाल लोकशाही मारुन टाकणारा आहे
भाजपप्रणित खोके सरकारला बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही. 2024 ला ते पुन्हा सत्तेत आले तर ते भाजपचं संविधान लागू करतील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदा दिल्लीवरुन लिहुन घेतलेला असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच स्वत:ची स्रिप्ट नसताना नवी संविधान लिहू इच्छिनाऱ्यांना हा निकाल दिला आहे. राष्ट्रवादीबद्दलही असाच निकाल दिला जाणार असून शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्याच्यावर निकाल द्यायला सांगितलं नव्हतं, मूळ ज्या गोष्टीवर बोलायचं ते बोललेच नाहीत. हा कदाचित सर्वोच्च न्यायालायचा अध्यक्षांनी अवमान केला असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
‘ये तो होना ही था’….निकालावरुन जितेंद्र आव्हाडांनीही सत्ताधाऱ्यांना घेरलं…
अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला होता. संजय राऊत यांनी विधासभा अध्यक्षांवर सडकून टीका केलीह होती. आदित्य ठाकरे यांनीही जोरदार हल्लाबोल केला. त्यांना असंसदीय शब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्यावर शिंद गटाकडून हक्कभंग प्रस्ताव आणला जाणार आहे. यावरही ठाकरेंनी भाष्य केलं. फासावर लटकावलं तरी चालेल. पण, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष लोकशाही आणि संविधानाचे मुडदा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, ते होऊ देणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे.