नार्वेकरांचा निर्णय आश्चर्यकारकच; अपात्र आमदार निकालावर असदुद्दीन ओवैसींचे टीकास्त्र
Asaduddin Owaisi : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय आश्चर्यकारच वाटला असल्याचे टीकास्त्र एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केलं आहे. शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. ओवैसी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
रफिक अन् राहुलचं अनोखं नातं! धर्माच्या सीमारेषा भेदत मुंबईत पार पडलं आंतरधर्मिय किडनी प्रत्यारोपण
ओवैसी म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदार प्रकरणावर जो निर्णय दिला आहे, तो ऐकून आश्चर्यच वाटलं. नार्वेकर घटनेतील दहावं आर्टीकल विसरुन गेले असल्याचं खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. आता पुढं काय होतं ते पाहू असंही ते म्हणाले आहेत.
भाजपमध्ये स्थिरावलेल्या नार्वेकरांनीही दोनदा ठोकला आहे राजकीय पक्षांना रामराम
जनता जलीली यांनाच निवडून देणार..
सध्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून इम्तियाज जलील यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात दोन वर्ष कोरोनाचं संकट होतं. मात्र, इतर तीन वर्षांत त्यांनी विकासाची कामे केली आहे. याआधीच्या काळातील खासदारांनी इथला विकास केला नव्हता तो विकास आता जलील यांनी केला असून इथली जनता आगामी निवडणुकीत जलील यांनाच निवडून देणार असल्याचा विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील नेते कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतात…
राज्यात सध्या कोणी या पक्षात तर कोणी त्या पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यावरही ओवैसी यांनी थेट भाष्य केलं आहे. जसे कपडे बदलले जातात तसेच नेते पक्ष बदलत आहेत. कोणीही कोणत्याही रंगाचे कपडे घालत आहेत. पण आम्ही एकाच रंगाचे कपडे घालत असल्याचं ते म्हणाले आहेत.
येत्या 22 जानेवारील अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी केंद्र सरकारसह उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यावरही ओवैसी यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, आम्ही भूमिका बदललेली नाही, जर 6 डिसेंबर नसतं झालं तर काय झालं असतं, असं ओवैसी म्हणाले आहेत.