रफिक अन् राहुलचं अनोखं नातं! धर्माच्या सीमारेषा भेदत मुंबईत पार पडलं आंतरधर्मिय किडनी प्रत्यारोपण
मुंबई : आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी आईने मुलाला किंवा मुलाने आईला किडनी दान (Kidney Swap) केल्याचे ऐकले, वाचले किंवा पाहिले असेल. मात्र, मुंबईतील केईएम रूग्णालयात नुकतेच करण्यात आलेले किडनी प्रत्यारोपण इतरवेळी करण्यात येणाऱ्या प्रत्यारोपणापेक्षा वेगळे आणि चर्चेचा विषय ठरेले आहे. कारण, हिंदू आणि मुस्लिम धर्माचे बंधन झुगारून या दोन कुटुंबियांनी एकमेकांच्या रूग्णांना किडनी दान केल्याने दोन रूग्णांना जीवनदान मिळाले आहे. (Rare Interfaith Kidney Swap In Mumbai)
आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार बंपर Increment : सर्व्हे
कशी झाली दोन कुटुंबियांची भेट?
गेल्यावर्षी मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये चार जणांना आणण्यात आले होते. त्यापैकी दोन किडनीचे रुग्ण तर दोन दाते होते. यावेळी कल्याणचे रहिवासी रफिक शाह आणि घाटकोपरचे आयुर्वेदिक डॉक्टर राहुल यादव यांची केईएम हॉस्पिटलच्या डायलिसिस क्लिनिकमध्ये भेट झाली होती. दोन्ही रूग्णांच्या नातेवाईकांपुढे किडनी दाता शोधण्याचे आव्हान होते. त्यानंतर हळूहळू दोन्ही कुटुंबियांमध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी पुढाकार घेत एकमेकांच्या नातेवाईकांना किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
अदानी समुहाकडून गुजरातला मोठं गिफ्ट; स्पेसमधून दिसणारं ग्रीन पार्क उभारणार
रक्तगट समान नसल्यामुळे समस्या
कल्याणचे रहिवासी असलेल्या शाह यांची दोन वर्षांपूर्वी किडनी निकामी झाली होती. तेव्हापासून त्यांची पत्नी खुशनुमा यांना पती रफिक यांना त्यांची एक किडनी दान करण्याची इच्छा होती. परंतु, खुशनुमा यांचा रक्तगट A+ असल्याने त्यांना किडनी देणे शक्य नव्हते. तर, राहुल यादव (वय 27) यांची किडनी निकामी झाल्याने त्यांनादेखील डोनर हवा होता. मात्र, त्यांच्या आईचा रक्तगट B+ होता तर, राहुल यांचा रक्तगट A+ होता. त्यामुळे गिरीजा याजव यांना मुलाला किडनी दान करण्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे एका रूग्णाची पत्नी आणि दुसऱ्या रूग्णांची आई किडनी दान करण्यास तयार असतानाही रक्तगट मॅच होत नसल्याने हे दान होऊ शकत नव्हते.
Ayodhya : राम मंदिराच्या उद्घाटनाने अयोध्येच्या ठाकुरांची ‘ती’ शपथ पूर्ण! 500 वर्षांनंतर घालणार पगडी
दोन्ही रूग्णांच्या नातेवाईकांनी साधला मध्य
जगभरातील रूग्णांलयांमध्ये डोनर आणि रूग्णाच्या नोंदी जतन करून ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे केईएम रूग्णालयातही शाह आणि यादव यांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार गिरीजा यादव यांची किडनी रफिक शाह यांना तर, खुशनुमा यांची किडनी राहुल यादव यांना मॅच होऊ शकते हे डॉक्टरांना माहिती होते. त्यासाठी दोन्ही कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर रफिक यांच्या पत्नी खुशनुमा यांची किडनी राहुल यादव यांना तर, गिरीजा यादव यांची किडनी रफिक शाह यांना देण्यात आली.
देशात कधी झाले होते पहिले आंतरधर्मिक प्रत्यारोपण
अशाप्रकारे आंतरधर्मिय किडनी प्रत्यारोपण करण्याची ही देशातील पहिलीच वेळ नाहीयेय याआधी देशातील पहिले हिंदू-मुस्लिम आंतरधर्मिक प्रत्यारोपण 2006 मध्ये मुंबईत करण्यात आले होते. त्यानंतर जयपूर, चंदीगड आणि बेंगळुरू येथेदेखील अन्य आंतरधर्मीय प्रत्यारोपणाची नोंद करण्यात आली आहे.
Ram Mandir चं उद्घाटन अन् गर्भवती मातांची अनोखी मागणी; अयोध्येतील अजब प्रकार
वयाच्या सातव्या वर्षाी निकामी झाली होती राहुल यादव यांची किडनी
घाटकोपरचे आयुर्वेदिक डॉक्टर राहुल यादव यांचे वडील रिक्षाचालक आहेत. राहुल सात वर्षांचे असताना किडनीची समस्या उद्भवली. त्यानंतर त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपर्यंत राहुल यासाठी औषधोपचार घेत होते. मात्र, त्यानंतर डायलेसिस आणि किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता असे राहुल यांच्या वडिलांनी सांगितले. धर्म वेगळे असतानाही दोन्ही कुंटुबियांनी दाखवलेल्या पुढाकाराने रफिक शाह आणि राहुल यादव यांना जीवनदान मिळाले आहे. शाह आणि यादव यांच्या या कृतीमुळे सर्वधर्म समभाव असल्याचे अधोरेखित झाले आहे.