Download App

आधी भाकरी-चाकरीवरुन खडाजंगी अन् मग आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन हास्यकल्लोळ

  • Written By: Last Updated:

Devendara Fadanvis On Aditya Thackeray Marriage :  राज्यातील विविध प्रश्नांवरून विधानसबेत विरोधकांनी लक्षवेधीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे आपण सर्वांनी पाहिले. आज विधानसभेत भाकरी चाकरीवरून खडाजंगी पाहण्यास मिळाली. त्यानंतर बच्चू कडूंनी लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावरून एकचं हशा पिकला. बच्चू कडूंनी हा प्रश्न आदित्य ठाकरेंकडे बघून विचारला का? असा प्रश्न फडणवीसांनी केला आणि सभागृहात हशा पिकला.

https://letsupp.com/life-style/indian-young-married-girls-sexually-active-report-26256.html

त्याचे झाले असे की, आमदार बच्चू कडूंनी कामगारांच्या लग्नावरुन प्रश्न विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही आदित्यजींकडे बघून प्रश्न विचारला का?, अशी मिश्किल टिपणी केली. फडणवीसांच्या या प्रतिप्रश्नानं सभागृहात एकच हशा पिकला. एवढचं नव्हे तर, सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे फडणवीस म्हणाले. यावर आदित्य ठाकरेंनी ही काही राजकीय धमकी आहे का, आधी लग्न लावून देऊ तरच इथे बसा वगैरे अशी मिश्किल टिप्पणी केली. एवढ्यावरच हा विषय थांबतोय असं वाटतं असतानाच नार्वेकरांनी री ओढत आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं.” असं विधानं केलं. त्यावर फडणवीसांनी कोणाचंही तोंड कसं बंद करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न हे मी अनुभवातून बोलतोय असं विधान केले.

…म्हणूनच शिंदे-फडणवीस सरकारचा असू शकतो हा डाव

अन् दादा भुसेंवर अजित पवार संतापले 

दरम्यान, या हास्यकल्लोळापूर्वी संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर मंत्री दादा भुसे आज विधानसभेच चांगलेच तापल्याचं पाहायला मिळाले. दादा भुसेंनी थेट शरद पवारांची चाकरी करत असल्याचं संजय राऊतांना म्हंटलंय. त्यावर विधानसभेत अजित पवार दादा भुसेंवर चांगलेच चिडल्याचं दिसून आलं. यानंतर अजित पवार दादा भुसेंवर चांगलेच संतापले. सभागृहात प्रत्येकाला आपली भूमिका मांडाण्याचा अधिकार आहे. तसंच दादा भुसेंनीही त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर आपली काय भूमिका मांडायचीय ते मांडा पण यामध्ये आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारांचं नाव घेण्याचं काहीच काम नसल्याचं अजित पवार दादा भुसेंना उद्देशून म्हंटले आहेत.

भाकरी मातोश्रीची खातात अन् चाकरी शरद पवारांची करत असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उद्देशून थेट विधानसभेत म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दादा भुसेंवर घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. चौकशीत आरोप जर खरे निघाले तर आमदारकीचाच नाहीतर राजकारणातून राजीनामा देणार असल्याचं चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलंय.

Tags

follow us