Aaditya Thackeray on Cm eknath Shinde: शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे व खासदार प्रियांका चतुर्वेदी या हैदराबाद विद्यापीठामध्ये एक दिवसाच्या दौऱ्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय एजन्सीकडून अटकेची शक्यता होती. या भितीने ते मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला असे सांगत होते, असा गौप्यस्फोट ठाकरे यांनी केलाय आहे.
पाटलांची औलाद, 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली; शहाजीबापूंचे खोक्यांवरून खणखणीत उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, हिंदुत्व, काँग्रेसबरोबर ठाकरे का गेले असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, चाळीस लोक हे पैसेसाठी आम्हाला सोडून गेले होते. एकदिवस एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर आले होते. केंद्रीय एजन्सीकडून अटक होऊ शकते असे सांगून ते रडू लागले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.
’50 खोके’चे रॅप सॉंग करणाऱ्या राज मुंगासेला अटकपूर्व जामीन मंजूर…
आता ते हिंदुत्वासाठी गेले असल्याचे सांगत आहेत. परंतु ते चुकीचे सांगत आहे. त्यांनी विश्वासघात केला आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसविला असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता, असे ठाकरे म्हणाले आहेत.