’50 खोके’चे रॅप सॉंग करणाऱ्या राज मुंगासेला अटकपूर्व जामीन मंजूर…

’50 खोके’चे रॅप सॉंग करणाऱ्या राज मुंगासेला अटकपूर्व जामीन मंजूर…

Raj Mungase Granted Anticipatory Bail : चोर आले… चोर आले… एकदम ओके होऊन, 50 खोके घेऊन किती चोर आले, हे रॅप सॉंगनं (Rap song)सोशल मीडियावर (Social media) काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. या मराठमोळ्या रॅपरनं आपल्या गाण्यातून राज्यातील भाजप,(BJP) शिवसेना शिंदे गटावर (Shivsena Shinde Group) जोरदार टीका केली आहे. या रॅपचा व्हिडीओ (Viral Video)विरोधकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. पाहता-पाहता एका आठवड्यात या रॅप सॉंगनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या रॅपमध्ये अश्लिल शब्दांचा वापर केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या पदाधिकारी स्नेहल कांबळे (Snehal Kamble)यांनी रॅपर मुंगासे याच्याविरोधात अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते, पण तो बेपत्ता झाला होता. आता मुंगासेला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राज मुंगासे समोर आला आहे. त्यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांना येणार ‘एवढ्या’ जागा?

रॅपर राज मुंगासेनं एक व्हिडीओ शेअर करत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की, काही दिवसांपूर्वी मी एक रॅप केला होता. तो आमदार जितेंद्र आव्हाड, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शेअर केला. त्यानंतर तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

त्यानंतर अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माझ्यावर एफआयआर दाखल केली. त्यानंतर मी थोडासा बाहेर होतो. म्हणजे पोलीस मला शोधत होते. त्यानंतर मी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मला अटकपूर्व जामीनसाठी मदत केली. त्यांनी वकील मिळवून दिला. आणि अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न केले.

जोपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही, तोपर्यंत मी एका ठिकाणी लपून बसलो होतो. जेव्हा मला माहिती झालं की, जामीन मिळाला आहे, त्यानंतर अंबादास दानवे यांना भेटलो आणि त्यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली. आता मी त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथे जात आहे. यादरम्यानच्या काळात आपल्या वकीलांचे चांगले सहकार्य मिळाल्याबद्दल राजने त्यांचेही आभार मानले आहेत. असेच पाठिशी राहा, जय भीम अशा प्रकारचा व्हिडीओ रॅपर राज मुंगासेनं शेअर केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube